शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 3 फेब्रुवारी 2019 ते 9 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 10:36 IST

जाणून घ्या कसे असेल तुमचे आठवड्याचे राशीभविष्य

मेष

बदलत असलेली परिस्थिती हि आपणास आव्हानात्मक ठरणार असल्याने ह्या आठवडयात आपणास व्यक्तिगत बाबीं ऐवजी व्यावसायिक बाबींवर अधिक लक्ष द्यावे लागेल. प्रेम प्रकरणात विशेष त्रास होणार नसला तरी कदाचित भेटीगाठी कमी होतील, तेव्हा त्रागा करू नये. आणखी वाचा

वृषभ

ह्या आठवडयात प्रेम प्रकरणास पोषक असे वातावरण असेल परंतु शेवटच्या दोन दिवसात आपली मनःस्थिती अधिक रोमँटिक होईल, तेव्हा आठवड्याच्या अखेरीस आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ घालवणे जास्त उचित ठरेल. आणखी वाचा

मिथुन

हा आठवडा आपल्यासाठी आनंदमयी आहे. प्रकृतीच्या काही तक्रारी असल्यास त्या दूर होतील. मानसिक चिंता कमी होतील. वैवाहिक जोडीदाराशी संबंधात माधुर्य वाढेल. व्यावसायिक दृष्टया महत्वाचे निर्णय अधिक सुलभतेने घेऊ शकाल. आणखी वाचा

कर्क

हा आठवडा आपल्यासाठी मौजेचा आहे. शारीरिकपेक्षा मानसिक स्थिती अधिक सुदृढ असेल. मोठे निर्णय सहजपणे घेता येतील. आपल्या निर्णयांची अमल बजावणी ठामपणे करू शकाल. आपण घेतलेले व्यावसायिक निर्णय आपणास अनुकूल असतील. आणखी वाचा

सिंह

ह्या आठवडयात आपणास माता - पित्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळतील. खर्चात वाढ होईल. शत्रुभय राहील. मानहानी होण्याची शक्यता आहे. राजकीय कार्यात आपण यशस्वी होऊ शकाल. निरर्थक कार्यात आपला वेळ वाया जाईल. आणखी वाचा

कन्या

व्यापार - व्यवसायात अपेक्षित यश लाभेल. प्राप्तीत वाढ होईल. मनोरंजनात्मक प्रवृत्तीत वेळ घालवू शकाल. वाहनसौख्य लाभेल. सामाजिक प्रसंगासाठी बाहेर जावे लागेल. विद्यार्थ्यांची अभ्यास विषयक चिंता वाढेल. अचानकपणे एखाद्या जुन्या मित्राची भेट घडेल. आणखी वाचा

तूळ

ह्या आठवडयाच्या सुरवातीस आपल्या संबंधात विशेष असे काही घडणार नसले तरी मध्यास आपली रोमँटिक भावना तीव्र होईल. उत्तरार्धात आपले प्रेम व्यक्त करण्यास किंवा नवीन संबंधाची मागणी घालण्यास दिवस उत्तम आहेत. आणखी वाचा

वृश्चिक

प्रणयी जीवनात जवळीक व विवाद दोन्हींची शक्यता ह्या आठवडयात असल्याचे दिसत आहे. सुरवातीस क्षुल्लक कारणांनी आपल्यात भांडण होईल, परंतु त्यामुळे पारस्परिक प्रेमात वाढ होऊन आठवडयाच्या अखेरचे दिवस एकमेकांच्या सहवासात आपण आनंदात घालवू शकाल. प्रणयी किंवा वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा

धनु

सध्या इच्छापूर्ती होण्याचे दिवस आहेत. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस मजेत घालवता येतील. वैवाहिक जोडीदाराशी संबंधात माधुर्य दिसून येईल. प्रेमाचा सेतू मजबूत होताना दिसून येईल. आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्या प्रयत्नांना अपेक्षित यश लाभेल. आणखी वाचा

मकर

हा आठवडा आपण सुखात घालवू शकाल. ह्या आठवड्या दरम्यान आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्यात स्फूर्तीचा संचार होईल. आपल्यात ऊर्जा वाढल्याचा अनुभव आपणास येईल. भूतकाळात प्रकृतीची जी काही समस्या होती त्यात आता सुधारणा होईल. आणखी वाचा

कुंभ

आठवडयाच्या सुरुवातीस नोकरी करणाऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नोकरीत किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना अनुकूलता लाभेल. व्यापार व्यवसाय उत्तम चालेल.  आणखी वाचा

मीन 

आठवडयाच्या सुरुवातीस मन खूपच प्रफ्फुलीत राहील. कुटुंबात एखादा शुभ प्रसंग साजरा होऊ शकेल किंवा एखाद्या सहलीचे आयोजन होऊ शकेल. मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळू शकेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष