शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

आठवड्याचे राशीभविष्य - 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 10:06 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवड्याच्या सुरुवातीस महत्वाच्या संबंधात सौहार्दता राहील. मात्र, आठवड्याच्या मध्यास संबंधात थोडी कटुता येण्याची शक्यता सुद्धा आहे. उत्तरार्धात आपल्या यशामुळे आत्मविश्वासात वाढ होऊन आपले मनोबल मजबूत होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण व्यावसायिक कामात खूपच सक्रिय राहाल. विशेषतः शिक्षण, लेखन, पत्रकारिता, रसायन इत्यादी कार्यात खूप मोठी प्रगती करू शकाल. व्यावसायिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी आपण अधिक प्रयन्तशील व्हाल. सध्या आपणास कामे पूर्ण करण्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील, परंतु इच्छित साध्य झाल्याने कार्यसंतोष मिळण्याची शक्यता सुद्धा आहे... आणखी वाचा

वृषभ

आपण संपत्तीने भरलेल्या विश्वाची कल्पना करत बसाल व आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आनंद - प्रमाद करण्याची अपेक्षा बाळगून असाल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुपार नंतर व्यावसायिक आघाडीवर आपले कामावर अधिक लक्ष राहू शकेल. आपला आर्थिक लाभ झाल्याने आत्मविश्वास सुद्धा वाढीस लागेल. आठवड्याच्या सुरवातीस अभ्यासात सुद्धा यशप्राप्ती होईल. हा आठवडा भाग्याचा व आशावादी असल्याचे जाणवेल. आपली सकारात्मक वृत्ती उच्च शिक्षणात यशस्वी होण्यास मदतरूप होऊ शकेल. आठवड्याच्या मध्यास आपल्या भावना ज्या व्यक्तीस आपण व्यक्त करून दाखवू शकाल अशा व्यक्तीचा शोध घेण्याची आपणास तीव्र इच्छा होईल... आणखी वाचा

मिथुन

आठवड्याच्या सुरुवातीस आपले मन व्याकुळ झाल्याने महत्वाच्या कामासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी पहिल्या दिवसाच्या दुपार पर्यंतची वेळ आपणास अनुकूल नाही. व्यावसायिक आघाडीवर सुद्धा पहिल्या दिवशी आपले लक्ष कमी लागेल. तसे पाहू गेल्यास मागील एक महिन्या पासून आपण कामात अनेक आव्हानांचा सामना करत असल्याने आपणास प्रत्येक पाऊल सावधपणेच उचलावे लागेल. कामाच्या ठिकाणी भागीदाराची एखादी मागणी किंवा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास काम करावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा मेहनत करण्याचा आहे. मात्र, धार्मिक बाबींमध्ये रुची असणाऱ्यांना सध्या काहीतरी नवीन शिकावयास मिळेल... आणखी वाचा

कर्क

आठवड्याचे ग्रहमान आपणास व्यवस्थितपणे काम करण्यास व प्रियजनांशी अधिक सक्रिय राहण्यास सुचवत आहे. गुरूचा लाभदायी प्रभाव नोकरीत होताना दिसून येईल व त्यामुळे आपण प्रगतीपथावर वाटचाल करू शकाल. त्याच बरोबर नोकरीत बदल करण्याचा विचार सुद्धा मनात येऊ शकतो. प्रणयी किंवा दांपत्य जीवनात आठवड्याच्या सुरवातीस काही समस्या निर्माण होतील, परंतु नंतर हळू हळू त्यांचे निराकरण होईल. मात्र, ह्या नंतरच्या काळात आपल्या संबंधात नीरसता येण्याची शक्यता असल्याने संबंधात जिवंतपणा ठेवण्यासाठी आपणास विशेष प्रयत्नशील राहावे लागेल... आणखी वाचा

सिंह

आठवड्याच्या सुरुवातीस दांपत्य जीवनास प्रभावीपणे सांभाळू शकाल. प्रियजनांशी संबंध टिकवून ठेवण्यात आपण अधिक सक्रिय व्हाल व एकमेकांचे सानिध्य सुद्धा उपभोगू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपणास अधिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे. शक्यतो आपल्या शक्तीच्या पलीकडे जाऊन कामे करू नयेत. उत्तरार्धात व्यावसायिक आघाडीवर आपण भविष्यातील कल व मनोवैज्ञानिक बाबींना उत्तम प्रकारे समजू शकत असल्याने कामाच्या ठिकाणी मोठी जवाबदारी सहजपणे स्वीकारून त्या उत्तम प्रकारे पार पाडण्यात आपल्या सामर्थ्याची व कौशल्याची ओळख निर्माण करू शकाल... आणखी वाचा​​​​

कन्या

आठवड्याच्या सुरुवातीस सरकारी कार्यात यश प्राप्ती होईल. संततीच्या प्रश्नात विशेषतः अभ्यासाच्या बाबतीत अधिक व्यस्त राहाल. आर्थिक लाभ होईल किंवा आर्थिक योजना तयार कराल. व्यावसायिक नियोजन करू शकाल. इतरांशी जास्त प्रमाणात संपर्क होईल. आठवड्याच्या मध्यास बौद्धिक कार्यात सहभागी होण्याची संधी लाभेल. आपण इतरांच्या लाभासाठी काही सेवाकार्य कराल. आपले वैचारिक स्थैर्य वाढल्याने महत्वाचे निर्णय घेण्यात अनुकूलता लाभेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल... आणखी वाचा

तूळ​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस कार्याची नवीन सुरवात करण्याचा उत्साह राहील, मात्र इतरांवर विश्वास ठेवण्या ऐवजी स्वतःच्या पद्धतीने सारासार विचार करून मार्गक्रमण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या आठवड्यात आपली एखादी हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आघाडीवर आपली वृत्ती न्यायाची असली तरी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी चर्चे दरम्यान उगाच वाद घालू नये तसेच वागणुकीत अहंकार नसावा. आठवड्याच्या मध्यास आपला कल प्रेम संबंधांकडे असेल. आठवड्याच्या उत्तरार्धात व्यावसायिक आघाडीवर कामाचा ढीग पाहून घाबरून न जाता नियोजनपूर्वक कामे करून निर्धारित वेळेत ती पूर्ण करण्याची आपणास प्रेरणा होईल... आणखी वाचा

वृश्चिक​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस आपण व्यापार - व्यवसायाच्या विकासाकडे अधिक लक्ष द्याल. परंतु पहिल्या दिवशी आपण कामाच्या कटकटीतून सुटून कुटुंबीय व माता - पिता ह्यांच्यासह यात्रेस जाण्याची शक्यता सुद्धा आहे. पूर्वार्धात आपण कुटुंबीय व त्यांच्या गरजा पुरविण्याकडे अधिक लक्ष द्याल. आपल्या ह्या वृत्तीमुळे कुटुंबीय खुश होतील व आपणास कामाच्या व्यापातून सुद्धा हलकेपणा जाणवेल. आठवड्याच्या मध्यास वडीलधारी व मित्रांची भेट होऊ शकेल. प्रणयी जीवनास अनुकूलता लाभेल. अचानकपणे प्रियव्यक्तीची भेट होऊ शकेल... आणखी वाचा

धनु

आठवड्याच्या सुरुवातीस प्राप्तीत वाढ होण्यावर आपण लक्ष केंद्रित कराल. त्याच बरोबर मित्रांसाठी खर्च होण्याची सुद्धा शक्यता आहे. ह्या दरम्यान कोणाशीही चर्चा करताना शब्दात स्पष्टता व सौम्यता असावी. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यावसायिक आघाडीवर आपण नवीन विचार व जोमाने पुढे गेल्यास प्रलंबित कामे पूर्ण होतील, तसेच कार्यात यश प्राप्ती होऊ शकेल. घरातील शांततेचे व आनंदाचे वातावरण आपल्या मनास प्रसन्न ठेवेल. विशेषतः उत्तरार्धात कुटुंबियांच्या खुशीसाठी आपण काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल... आणखी वाचा

मकर

सध्या आपण जे काही कार्य कराल त्यात यशस्वी व्हाल. आरोग्य एकंदरीत चांगले राहील. कुटुंबियांसह सहलीस जाण्याची सुद्धा शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना लाभ होईल. सरकारी येणी येण्याची सुद्धा शक्यता आहे. व्यापारात नवीन संपर्क व ओळखीतून लाभ होतील. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापार - व्यवसायाची वृद्धी करणे शक्य होईल. तसेच त्या संबंधी विचार - विनिमय करता येईल. मैत्री, प्रेम, आराम व समृद्धी मिळविण्याचे मार्ग सोपे होतील. प्रणयी जीवन उत्तम राहिल्याने प्रिय व्यक्तीसह आनंदात वेळ घालवू शकाल... आणखी वाचा

कुंभ

आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुपार पर्यंत आपणास मजा येणार नाही. मनात विचारांचे वादळ उमटल्याने निर्णयशक्तीचा अभाव जाणवेल. मात्र, त्या नंतरचे ग्रहमान आपणास अनुकूल होईल. आपण स्वतःच्या खुशी व छंदांसाठी सक्रिय व्हाल. मित्र व स्नेहीजनांचा प्रेमळ सहवास लाभेल. आपल्या कार्यात आपणास यश प्राप्त होईल. आर्थिक लाभ सुद्धा होतील. आपल्यात भरपूर आत्मविश्वास असल्याने प्रत्येक कार्य आपण दृढ निर्णयशक्तीच्या जोरावर करू शकाल. व्यावसायिक क्षेत्रात अचानक धनलाभ संभवतो...आणखी वाचा

मीन​​​​​​​

आठवड्याच्या पूर्वार्धात जमीन, वाहन इत्यादींचे सौदे करण्याचे किंवा त्यांचे दस्तावेज करण्याचे स्थगित करावे. स्त्री वर्ग व पाण्या पासून नुकसान होण्याची शक्यता आहे. संततीची समस्या आपणास चिंतीत करेल. शेअर्स - सट्ट्यात न पडण्याचा इशारा देण्यात येत आहे. व्यावसायिक क्षेत्रात आपणास आठवड्याच्या उत्तरार्धात लाभ होऊ शकेल. उत्तरार्धात भागीदारी व्यवसायात प्रगती साधण्याची अनुकूल संधी प्राप्त होईल. नवीन करार सुद्धा करू शकाल. सध्या कामातील स्थैर्यासाठी आपण अधिक सक्रिय व्हाल. पूर्वी केलेल्या कामाचे फळ म्हणून काही लाभ होऊ शकेल. कार्यालयात सहकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण करू शकाल... आणखी वाचा

​​​​​​​

टॅग्स :Astrologyफलज्योतिष