शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 09:14 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

आठवड्याचे सुरुवातीचे दिवस आपल्या जीवनात स्थैर्य निर्माण करू शकतील. संबंध व आर्थिक बाबतीत काळजीचे कारण नसल्याने आपण शांततेत आठवडा घालवू शकाल. आपणास मानसिक त्रास होऊ नये म्हणून आपल्या वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारचे विनाकारण वाद करणे टाळा. एकंदरीत ह्या आठवड्यात आपल्या कारकिर्दीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. व्यापाराच्या ठिकाणी विनाकारण विवाद किंवा मतभिन्नते पासून दूर राहावे. व्यावसायिक जीवनात आपण काहीसे प्रभावहीन राहाल. आठवड्यात कदाचित आपल्या धाडसात आपणास निराशेचा सामना करावा लागेल... आणखी वाचा

वृषभ 

आठवड्याच्या सुरुवातीस मानसिक व्यग्रतेमुळे आपले कशात लक्ष लागणार नाही. अशा परिस्थितीत झालेली एखादी चूक आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी शक्य असल्यास व्यावसायिक कामातून विश्रांती घेऊन आप्तांसह वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे मानसिक दृष्ट्या आपणास हलके वाटून नवीन ऊर्जेचा संचार होईल. दुसऱ्या दिवसा पासून आपली कामातील एकाग्रता वाढेल. सौंदर्यवर्धके, शिक्षण, बँकिंग, वित्त, माध्यमे इत्यादी सारख्या बुद्धीस चालना देणाऱ्या कार्यात प्रगती साधू शकाल... आणखी वाचा

मिथुन 

आठवड्याच्या सुरुवातीस नवीन मैत्री, संबंध व सामाजिक चर्चा - विचारणा करण्यास अनुकूलता लाभेल. ह्या दरम्यान आपली आध्यात्मिक विषयातील गोडी वाढेल. व्यावसायिक आघाडीवर आपण चांगली सुरवात कराल परंतु आठवड्याच्या मध्यास आपल्या मनात विचारांचे वादळ उठेल. आठवड्याच्या मध्यास अनावश्यक आर्थिक बाबींशी संबंधित चिंतेमुळे ताण जाणवेल. उत्तरार्धात आपण पुन्हा पूर्ण उत्साह व आयोजनासह कामात प्रगती साधू शकाल. आपल्या कामाचा भार वाढला तरी व्यावसायिक प्रगती साधण्यासाठी त्याची खूप मदत होईल... आणखी वाचा

कर्क

आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या अधिरतेमुळे कुटुंबीय व वैवाहिक जोडीदाराशी वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवनात सुधारणा व कुटुंबियांशी संबंधात सौहार्दता निर्माण होईल. ह्या दरम्यान संबंधात एकसारखी विचारसरणी, आवड - निवड व मतप्रवाह हे केंद्रस्थानी असतील. आठवड्याच्या मध्यास आपणास विशेष काळजी घ्यावी लागेल तसेच शक्य असल्यास खाण्या - पिण्यात स्वच्छतेचा आग्रह बाळगावा लागेल. आपले आरोग्य एकंदरीत चांगलेच राहील. परंतु, जर एखादी लहान - सहान समस्या असली तर त्या बाबत बेफिकीर न राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

सिंह

आठवड्याच्या सुरुवातीस ग्रहांच्या स्थितीमुळे आपण दयाळू, विनम्र व संवेदनशील व्हाल व त्यामुळे आपण कुटुंबियांच्या गरजा व इच्छा ह्यांना उत्तम प्रकारे समजू शकाल. मात्र, कुटुंबा संबंधी कोणताही निर्णय घाईघाईत घेतल्यास संबंधात कटुता निर्माण होऊ शकेल व त्यामुळे काही गैरसमज सुद्धा होतील. आठवड्याच्या मध्यास कामाचा अतिरिक्त भार घेण्या ऐवजी जर कामाची गती थोडी कमी केलीत तर आरोग्य निश्चितपणे चांगले राखू शकाल. शक्यतो शारीरिक जोखीम असेल अशा कोणत्याही प्रवृत्ती पासून दूर राहण्याचा तसेच काळजीपूर्वक वाहन चालविण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

कन्या

आठवड्यात पती - पत्नीत वैवाहिक जीवनाची जवळीक साधली जाईल. प्रेमी युगल सुद्धा प्रणयात रममाण होऊ शकतील. यश व कार्य - सिद्धी आपणास सार्वजनिक जीवनात यश - कीर्ती व प्रसिद्धी मिळवून देईल. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी अचानक खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. आठवड्याच्या मध्यास मित्र व स्वजनांकडून भेटवस्तू मिळण्याची व दूरवर राहणाऱ्या आप्तांची भेट किंवा संपर्क होण्याची शक्यता आहे. त्यांच्यासह एखादी सहल सुद्धा घडू शकेल. सदभावनेने केलेल्या परोपकारी कार्यामुळे आपणास आंतरिक समाधान लाभेल. कुटुंबियांशी चर्चा करताना वाणी संयमित ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

तूळ 

आठवड्याच्या सुरुवातीस वैवाहिक जोडीदार किंवा प्रियव्यक्तीशी आपली जवळीक वाढेल. त्यांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. भागीदारी किंवा सांघिक कार्यात सुद्धा पहिल्या दिवशी यशस्वी होण्याची अपेक्षा बाळगू शकता. पहिल्या दिवशी जर एखादा करार करावयाचा असेल तर पुढे जाण्यास हरकत नाही. तो फायदेशीरच ठरेल. मात्र, त्या नंतरच्या दोन दिवसात आपले मन काहीसे व्यग्र राहील. वैवाहिक जोडीदारास रुग्णालयात दाखल करावे लागण्याची वेळ येऊ शकते. पोटाचे विकार बळावतील. ह्या दरम्यान नवीन कामाची सुरुवात किंवा प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

वृश्चिक

आठवड्याच्या सुरुवातीस व्यावसायिक आघाडीवर आपण उत्साहात व अचूकपणे कामे करू शकाल. कामाच्या बाबतीत आपले विचार दृढ असतील. धनलाभ संभवतो. पहिल्या दिवशी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या मध्यास मित्र व नातेवाईकांचा सहवास घडेल व त्यामुळे प्रसन्नता जाणवेल. भागीदारीत आपली कामे अपेक्षेप्रमाणे पार पडतील व कष्टाच्या प्रमाणात यश प्राप्ती झाल्याने आपण संतुष्ट व्हाल. आठवड्याच्या मध्यास नवीन करार करण्यासाठी पुढाकार घेऊ शकाल. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. व्यापाऱ्यांना वसुलीसाठी हा आठवडा अनुकूल आहे... आणखी वाचा

धनु​​​​​​​

आठवड्याच्या सुरुवातीस आपण संबंधांकडे अधिक लक्ष द्याल व विशेषतः प्रेम संबंधांकडे अधिक झुकलेले राहाल. तसे पाहू गेल्यास ह्या आठवड्यात आपणास संबंधांचे उत्तम सौख्य लाभले तरी उत्तरार्धात थोडे जपावे लागेल. नोकरी करणाऱ्यांना पूर्वार्धात उत्तम संधी लाभतील. मात्र, वक्तृत्वाशी संबंधित क्षेत्रात आपण मागे राहण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान हितशत्रू ह्या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा शक्यतो तशी संधी त्यांना देऊ नका. आठवड्याच्या मध्यास राजकीय कारणांमुळे आपली कामे खोळंबतील... आणखी वाचा

मकर​​​​​​​

आठवड्यात समाधानी वृत्ती बाळगल्यास अनेक संघर्षमय स्थितीतून सुखरूपपणे बाहेर पडू शकाल. जोखीम असलेल्या कामात अत्यंत सावध राहावे लागेल, अन्यथा एखादी दुखापत संभवते. आपल्या व्यापारास एक ठरविक गती सापडल्याने आपला आर्थिक लाभ होईल. मात्र, निर्णय घेताना मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नाम स्मरण केल्याने थोडा आधार मिळेल. कदाचित सरकारी व कायदेशीर डावपेचात सापडाल. नोकरीत वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकणार नाही, तेव्हा स्वतःच्या आत्मबळाच्या जोरावर पुढे जावे... आणखी वाचा

कुंभ​​​​​​​

वर्तमान व दीर्घकालीन चिंतांचा आपण विचार कराल व भविष्यातील योजनांचा विस्तार कसा करावा ह्यावर सुद्धा लक्ष केंद्रित कराल. हाती घेतलेली कामे पूर्ण कराल किंवा परत तितक्याच आक्रमकपणे पुन्हा कामे सुरु कराल. व्यापारवृद्धीचे विचार आपल्या मनात घोळत राहतील. त्यांची अंमल बजावणी करण्यासाठी आपण अधीर व्हाल. हा आठवडा व्यावसायिक दृष्ट्या लाभदायी आहे. आर्थिक लाभ संभवतात. आयात - निर्यातीशी संबंधित कार्यात यशस्वी होऊ शकाल. प्रियव्यक्ती समोर आपले विचार व्यक्त करताना थोडा संकोच वाटला तरी बऱ्याच विचारा अंती ते मांडू शकाल... आणखी वाचा

मीन 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण प्राप्तीवर अधिक लक्ष द्याल. व्यावसायिक आघाडीवर कोणताही नवीन निर्णय घेण्या ऐवजी सद्य स्थिती टिकवून ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. कुटुंबियांसह आठवडा आनंदात घालवू शकाल. मात्र, कुटुंबात कोणत्याही मुद्द्यावर गैरसमज टाळावे लागतील. आठवड्याच्या मध्यास आपण आर्थिक भविष्याच्या सुरक्षिततेसाठी किंवा कुटुंबियांच्या आनंदासाठी खर्च करण्याची शक्यता आहे. विशेषतः हौसमौज व वैभवी जीवनशैलीसाठी अतिरिक्त खर्च टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष