शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

आठवड्याचे राशीभविष्य - 16 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 08:30 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

दि.१६ व १७ दरम्यान पत्नी व कुटुंबियांशी कटुता निर्माण होऊ शकते. हे दिवस निरर्थक ठरतील. आपल्या मागे आपल्या विषयी वाईट बोलले जाईल. आपला विश्वासघात होऊ शकतो. हे दिवस आपल्यासाठी निराशाजनकच आहेत. परदेशी कामात अपयश मिळेल. वडिलधाऱ्यांशी मतभेद होतील. दूरवरच्या प्रवासात त्रास होईल हे लक्षात ठेवावे.  आणखी वाचा

वृषभ

दि.१६ पासून रवी आपल्या अष्टमातून शनीसह भ्रमण करीत असल्याने आपली विचारशैली नकारात्मक व निराशावादी होईल. सरकार संबंधी कार्यात किंवा सरकारी कर्मचाऱ्यांशी संघर्ष संभवतो. अधिकारी वर्गास हे दिवस त्रासदायी आहेत. वडिलधाऱ्यांशी कटुता होऊ शकते. आणखी वाचा

मिथुन

दि.१६ पासून रवी आपल्या सप्तमातून शनीसह भ्रमण करेल, त्यामुळे आपल्या भागीदारी व्यवसायात काही अडचणी येतील. पोटाचे विकार व डोकेदुखी ह्यांचा त्रास होईल. आपली विचारशैली निराशावादी होईल. व्यापारात प्रगती होईल व सरकारी कामात यशप्राप्ती होईल. दि.१६ व १७ दरम्यान आपणास एखाद्या पार्टीत किंवा समारंभात सहभागी व्हावे लागेल. आणखी वाचा

कर्क

आठवड्याचा प्रथम दिवस आपल्यासाठी निराशाजनक आहे. अचानक इजा होऊन अस्थिभंग होण्याची शक्यता असल्याने वाहन चालवताना व कोणतेही कार्य करताना उगाचच घाई करणे टाळावे. दि.१७ दरम्यान आपण आध्यात्मिक चिंतन कराल. दि.१६ पासून रवी आपल्या षष्ठातून भ्रमण करू लागल्याने कार्य सिद्धी होऊन सुख प्राप्ती होईल. आणखी वाचा

सिंह 

आठवड्याच्या प्रथम दिवशी दि.१६ पासून रवी आपल्या पंचमातून गोचरीच्या शनीशी युती करत आहे. त्यामुळे आपली विचारशैली नकारात्मक व वृत्ती निराशावादी होईल. आपणास सरकारी कार्यात त्रास होईल. प्रेम संबंधात संथ गतीने प्रगती होईल, परंतु त्यात सुद्धा अनेकदा अहं आडवा येईल. संतती संबंधी प्रश्न मागे पडतील. आणखी वाचा

कन्या

आठवड्याच्या सुरवातीस मातुलात मांगलिक प्रसंग होईल किंवा त्यांच्या कडून लाभ होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकाल. आपणास लैंगिक सुखाचा आनंद घेण्याची सुद्धा योग्य संधी लाभेल. नवीन भागीदारीच्या सुरवातीसाठी तसेच संयुक्त धाडस करण्यासाठी हे दिवस चांगले असल्याचे दिसत आहे. आणखी वाचा

तूळ

दि.१६ पासून रवी आपल्या तृतीयातून भ्रमण करेल, जे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरेल. आपल्या साहसी व पराक्रमी वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक आघाडीवर सुद्धा आपण काही नवीन करण्याचा किंवा वर्तमान कार्याचा विस्तार करण्याचा विचार कराल. छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक

ह्या आठवड्याच्या सुरवातीस दि.१६ पासून महिनाभर रवी आपल्या द्वितीयातून भ्रमण करेल, त्यामुळे काही आर्थिक व कौटुंबिक समस्या निर्माण होतील. नातेवाईकांशी वाद - विवाद होऊ शकतो. वाणीत अहंचा प्रभाव वाढेल. खांद्याचे स्नायू दुखावू शकतात. आपले विचार व मनोवृत्ती ह्यात फरक दिसून येईल. आणखी वाचा

धनु

दि.१६ पासून रवी आपल्या राशीतून शनीसह भ्रमण करेल, त्यामुळे आपल्या भागीदारी व्यवसायात काही अडचणी येतील. हे दिवस आपल्यासाठी सरकारी किंवा कायदाकीय खर्चाचे तसेच अतिरिक्त टॅक्स किंवा अन्य प्रकारे आर्थिक भार वाढविणारे आहेत. उच्च पदस्थ व्यक्तींशी संबंधात तणाव निर्माण होईल.  आणखी वाचा

मकर

आठवड्याचा प्रथम दिवस आपल्यासाठी निराशाजनक आहे. अचानक इजा होऊन अस्थिभंग होण्याची शक्यता आहे. दि.१७ दरम्यान आपण आध्यात्मिक चिंतन कराल. दि.१६ नंतर आपणास शत्रूंवर विजय प्राप्त करता येईल. सरकारी कामात यश व लाभ प्राप्ती होईल. आपण परोपकार व सेवा कार्य कराल. संतती संबंधी एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

कुंभ

आपल्यात आवेश, आक्रमकता, घाई, गती अशा शब्दांचा सध्या प्रभाव राहील. कोणत्याही कार्यात पटकन निवाडा करण्याची आपणास घाई होईल. मित्रानो, एक लक्षात ठेवा कि अती घाई केल्याने नुकसान होऊ शकते, त्यामुळे जेथे शक्य असेल तेथे शांती राखावी. अन्यथा आपल्या सिद्धीवर आपणच कुर्हाडीचा घाव घालाल.  आणखी वाचा

मीन

ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपल्या हर्षो उल्हासात वाढ होईल. संतती कडून चांगली व लाभदायी बातमी मिळेल. मित्रांची भेट आपल्यासाठी आनंददायी व लाभदायी राहील. नोकरी - व्यवसायात सुद्धा चांगला लाभ होईल. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण मनोमन सुखावाल. वैवाहिक जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांनी योग्य व्यक्तीची निवड करताना फसवणूक होत नाही ना ह्याची खातरजमा करून घ्यावी. आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष