शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

आठवड्याचे राशीभविष्य - 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 09:34 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

हा आठवडा आपणास त्रासदायी ठरणारा आहे. असे असले तरी सुद्धा काही कार्यात आपणास यश मिळू शकेल, परंतु अधिकतर कार्यात त्रास होण्याचे संकेत आहेत. शासकीय लाभ होतील, तसेच व्यावसायिक क्षेत्रात यश प्राप्त होईल. मात्र, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. भागीदारी कार्यात सुद्धा अडचणी येतील. कोर्ट - कचेरीच्या कार्यात वायफळ खर्च होईल. मनोमिलनात व आपसातील समजूतदारपणात काही त्रास होऊ शकतो. आपण एखादा महत्वाचा निर्णय घेण्यास प्रेरित व्हाल. आपण जे काम हाती घ्याल त्यात अयशस्वीच व्हाल, त्यामुळे थोडा धीर धरावा लागेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने आपल्या प्रलंबित कामांना चालना मिळेल... आणखी वाचा

वृषभ 

आठवडा मिश्र फलदायी आहे. आपल्या कार्यक्षमतेत वाढ होईल. कामे लवकर पूर्ण करा. परेदशाशी निगडित कामास वेग येईल. मात्र, यशस्वी होण्यापूर्वी अडथळे पार करावे लागतील. कठोर परिश्रमास पर्याय नसतो हे मात्र लक्षात ठेवावे. दीर्घकालीन गुंतवणूक आपणास फायदेशीर होईल. नियोजन करून वाटचाल करणे हितावह होईल, अन्यथा काम बाजूस राहील व खर्चात सुद्धा वाढ होत राहील. अशा परिस्थितीत आपली आर्थिक घडी विस्कळीत होईल व त्याचा दोष मात्र आपण कुटुंबियांना देत बसाल. नियोजन करून वाटचाल केल्यास विशेष त्रास होणार नाही... आणखी वाचा

मिथुन 

आठवड्यात आपण ज्या लोकांना भेटाल त्यापैकी काही लोकांशी पुढे जाता आपली घनिष्ट मैत्री होऊ शकते. सत्ता किंवा पैश्यांची हवा आपल्या डोक्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच बरोबर आपल्या साधेपणाचा कोणी गैरफायदा घेणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. ऋतुजन्य आजारपण सोडल्यास आपले आरोग्य उत्तम राहील. आपली रुढीचुस्तता, बेफिकीर स्वभाव, बडबडेपणा, प्रमादीपणा इत्यादी दुर्गुण न सोडल्यास आपण चुकीचे निर्णय घेऊन बसाल. आपला हट्टीपणा सोडून इतरांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघावे. त्यामुळे होऊ घातलेली कटुता आपण टाळू शकाल... आणखी वाचा

कर्क

नवीन विचारांची अंमल बजावणी आपण व्यवसायात कराल. शरीर आळसावलेले असेल. व्यापारातील वसुली शक्य होईल. नोकरी - व्यवसायात लाभदायी परिणाम मिळतील. पदोन्नतीचा मार्ग दिसेल. व्यापारास नवीन दिशा मिळत असल्याचे दिसेल. प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. नेत्र विकार संभवतात. कुटुंबियांच्या विरोधास सामोरे जावे लागेल. मात्र, प्रणयी जीवन चांगले राहील. वैवाहिक जोडीदार व प्रिय व्यक्तींशी सलोखा राहील. त्यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंदित व्हाल. खर्चात वाढ होईल. यशासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. काळजीमुळे आपले मानसिक आरोग्य हरवून जाईल... आणखी वाचा

सिंह

नोकरीत यशस्वी व्हाल. वरिष्ठ आपल्या कौशल्याचे कौतुक करतील. नोकरीत बक्षीस, पदोन्नती किंवा पगारवाढ संभवते. क्रोध व नैराश्य यांचा आपल्यावर पगडा राहील. प्रकृती नरम - गरम राहील. संततीचा अभ्यास किंवा प्रकृती ह्यांच्या काळजी व्यतिरिक्त वाढत्या खर्चामुळे आपण विचार मग्न असल्याचे दिसून येईल. कष्ट वाया जात असल्याची जाणीव होईल. कोणत्याही भ्रमात राहू नका. धार्मिक वृत्तीत वाढ होईल. समाजातील दुर्लक्षित लोक व गरजवंतांची सेवा, दान - धर्म, किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. उत्तम आरोग्य व स्फूर्ती ह्यामुळे जीवनातील आनंद अनुभवात. नातेवाईकांकडून काही भेटवस्तू मिळतील... आणखी वाचा

कन्या 

संततीच्या कारकिर्दीच्या बाबतीत आपला गोंधळ उडेल. ह्या विषयावर आपण एखाद्या अनुभवी व्यक्तीशी चर्चा - विचारणा करू शकता. कोणताही निर्णय घेता न आल्याने आपण गोंधळलेल्या स्थितीतच आठवडा घालवाल. अशा परिस्थितीत एखादी सुवर्ण संधी हातून निसटणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. प्रवासाचे आयोजन मध्येच थांबण्याचा धोका दिसत आहे. प्रवासास विलंब होऊ शकतो. ताणमुक्त झाल्याची जाणीव होईल. उत्साहित राहाल. मन स्नेह व आपुलकीयुक्त राहील. कौटुंबिक बाबींकडे लक्ष देताना सर्व गोष्टींचे समाधान करण्यासाठी कार्यरत राहाल. आशा पल्लवित होतील... आणखी वाचा

तूळ

विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आठवडा आहे. नवीन प्रकल्प किंवा कामगिरीमुळे मानसिक ताण राहील. चिंतातुर व्हाल. आपण जर दीर्घकाळा पासून आजारी असाल तर आता प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. कार्यालयात आपल्या कामाची प्रशंसा झाल्याने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. कुटुंबियांसह एखाद्या सामाजिक कार्यक्रमास जाऊ शकाल. छोटे प्रवास संभवतात. दिवस आनंदात जातील. व्यापाऱ्यांसाठी प्राप्तीची कवाडे उघडतील. व्यवसाय विस्ताराची बोलणी होतील. सुरक्षित भविष्यासाठी आपण दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा विचार सुद्धा कराल... आणखी वाचा

वृश्चिक

आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कामाचा अतिरिक्त ताण व खाण्या - पिण्यातील बेपर्वाई आपली प्रकृती बिघडवू शकते. नियमित व्यायाम, प्राणायाम व योगासन केल्यास लाभ होईल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावा. विविध विषयात आवड निर्माण होईल. उपयुक्त ज्ञान गोष्टीत सहभागी होऊन लाभ प्राप्त कराल. व्यवसायात त्रास होईल. नशिबाची साथ मिळत नसल्याची तक्रार राहील. वरिष्ठां पासून जपून राहावे. संततीमुळे त्रास होईल. विद्यार्थ्यांना वाईट संगती पासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे... आणखी वाचा

धनु

आपले ग्रहमान आपणास शासना विरुद्ध कार्य किंवा प्रवृतींपासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. चित्त थाऱ्यावर नसेल. कार्यात अनपेक्षितपणे होणाऱ्या विलंबास आपल्या नशिबाला आपण दोष देत असल्याचे दिसेल. व्यापारात आपण नवीन विचारांना कार्यान्वित कराल. मात्र, अंगात आळस भरल्याने प्रत्येक कामाचा आपणास लवकर उबग येईल. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वाद घालू नका. एखाद्या दुर्घटने पासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वसुलीसाठी केलेले व्यापारी प्रवास फलद्रुप होतील. संततीची प्रगती व कौटुंबिक जीवनातील सौहार्दतामुळे मानसिक हलकेपणा जाणवेल... आणखी वाचा

मकर

विनाकारण चिंता व त्रास होईल. कर्कशतेमुळे संबंधात कटुता येऊ देऊ नका. महत्वाच्या निर्णयात असमंजसपणाला सामोरे जावे लागेल. कामाची गती मंदावेल. बचतीची रक्कम कमी होईल. बँकेतील शिल्लक कमी होत जाईल. वायफळ खर्चांमुळे आपण त्रासून जाऊ शकता. आर्थिक अंदाजपत्रक कोलमडेल. व्यापारात नवीन तंत्राचा वापर कराल. प्रगतीसाठी नवीन कल्पनांचा विचार कराल. तसे केल्याने भविष्यात आपण प्रगतीच्या उच्च शिखरावर बिराजमान होऊ शकाल. बुद्धीचातुर्य व विवेकाने सहजपणे कामे करू शकाल. नीती व सिद्धांताच्या विरुद्ध जाणे आपणास पसंत नसते... आणखी वाचा

कुंभ

मानसिक थकवा जाणवेल. घरी किंवा कार्यालयात कामाची व्याप्ती काहीशी जास्त असल्याचे जाणवेल. ह्याची व्याप्ती इतकी जास्त असेल कि त्याची पूर्तता करताना आपली चिडचिड होऊ शकते. आपणास ह्या दोघात समतोल साधावा लागेल. हे सर्व आपणास स्वबळावरच करावे लागेल. जर कठोर परिश्रम केलेत व हुशारीने काही कामे इतरांना वाटून देण्यास शिकलात तर थोडा आराम मिळू शकेल. आपल्या संघातील सहकार्यांना सुद्धा त्यातून काही शिकण्यास मिळेल. जीवनात सांत्वना, मौजमजा, आनंद, सौख्य, कुटुंब व मित्रांसाठी धावपळ होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मीन

आपण नकारात्मक मानसिकता ठेवू नये. मनात असंतोष भरलेला राहील. कौटुंबिक वातावरणात सलोख्याचा अभाव असल्याचे दिसून येईल. प्रकृती सुद्धा चांगली राहणार नाही. मुख्यतः पित्त विकारांचा त्रास होईल. थोडक्यात ह्या आठवड्यात चोहोबाजूने आपण समस्यांनी घेरलेले असाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. आपले मन अनिर्णायक स्थितीत राहील. आपण अती संवेदनशील असल्याने आपलीच माणसे आपल्या समोर डोके वर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपणास वाटत राहील... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष