मेष
आठवडयाच्या पहिल्या दिवसाच्या माध्यान्हा पर्यंत आपल्या मनात अनेक विचारांचे वादळ उठेल व कदाचित बेचैनी किंवा अनिद्रा ह्यामुळे आपण व्याकुळ झालेले दिसून येईल. अशा परिस्थितीत व्यक्तिगत किंवा व्यावसायिक जीवनाशी निगडित कोणताही निर्णय घेणे हितावह होणार नाही. आणखी वाचा
वृषभ
आठवडयाच्या पहिल्या दिवसाच्या मध्यान्हा पूर्वी जरी काही त्रास होताना दिसत नसला तरी त्या नंतर आपली मानसिक स्थिती चांगली राहणार नाही व वैचारिक गोंधळामुळे कोणताही निर्णय आपण घेऊ शकणार नाही. आणखी वाचा
मिथुन
हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. आपले मित्र, मोठी भावंडे, किंवा आप्तेष्ट ह्यांचे उत्तम असे सहकार्य आपणास लाभेल असे सध्याचे ग्रहमान आहे. कुटुंबात एखादी छोटीशी पूजा अचानकपणे घातली जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क
आठवड्याची सुरवात चांगल्या बातमीने होईल असे ग्रहांचे भ्रमण दर्शवित आहे. आर्थिक दृष्टया विशेष असे काही दिसत नसले तरी नोकरीच्या बाबतीत हा आठवडा चांगला असल्याचे दिसत आहे. नवीन नोकरीची संधी लाभेल. अचानकपणे बढती होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसायाची सुरवात करू शकाल. आणखी वाचा
सिंह
आपली खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतती आपणास खुश करेल. आपण आपल्या ठामपणाने पुढे जाल. घाईगर्दीत आपले नुकसान मात्र करून बसाल. शत्रू व विरोधक आपल्या विरुद्ध कट - कारस्थान रचू शकतील. आर्थिक परिस्थिती तणावाची राहील. आणखी वाचा
कन्या
प्रकृती नरम गरम राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद - विवाद टाळावेत. आपण आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. एखादे नवीन कार्य शिकाल. संतती आपणास खुश करेल. आणखी वाचा
तूळ
ह्या आठवडयात प्रणयी जीवन सामान्यच राहील. सुरवातीस जोडीदारासह आपण उत्तम प्रकारे वेळ घालवू शकाल मात्र, आठवडयाच्या मध्यास एकमेकांच्या अधिक विन्मुख राहणे पसंत कराल. आर्थिक आघाडीवर आठवडयाच्या प्रथम दिवशी दुपार पर्यंत आपण कोणत्याही प्रकारे चांगली प्राप्ती करू शकाल. आणखी वाचा
वृश्चिक
आठवडयाच्या प्रथम दिवसाची सुरवात आपण प्रणयी जीवनातील माधुर्याने कराल, मात्र हे क्षणिकच असेल. मध्यान्हा नंतर आपण व्यावसायिक बाबींसाठी व्यस्त झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तीस आवश्यक तितका वेळ देऊ शकणार नाही. श्रीगणेशजी आपणास निराश होऊ नका असे सांगत आहेत. आणखी वाचा
धनु
ह्या आठवड्याची आपली सुरवात आनंददायी असेल. अचानकपणे आपली इच्छापूर्ती होऊ शकेल. आपले शारीरिक आरोग्य चांगले राहावे ह्यासाठी आपणास प्रयत्नशील राहावे लागेल. खेळाडूंना आपल्या सरावात वाढ करावी लागेल, जेणेकरून एखाद्या स्पर्धेसाठी आपली निवड होऊ शकेल. आणखी वाचा
मकर
हा आठवडा आपल्यासाठी एकंदरीत सुखदायी असल्याचे ग्रहांच्या भ्रमणा वरून दिसत आहे. आपल्या घराची खरेदी - विक्री किंवा राहत्या घरातील बदल करण्याची समस्या दूर होत असल्याचे दिसून येईल. आणखी वाचा
कुंभ
भावंडांचे संबंध चांगले होतील. एखादे नवीन धाडस करावयाचे असल्यास त्याला अनुकूल असे वातावरण निर्माण होईल. नोकरी करणार्यांना धनलाभ होईल. अतिरिक्त पगार किंवा बक्षिसी मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मीन
प्रकृती चांगली राहील. नोकरीत बढती, मान - सन्मान झाले असल्यास त्यात ओहोटी येण्यास सुरवात होईल. माता - पित्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात एखादा वाद होऊन कौटुंबिक वातावरण दूषित होत जाईल किंवा कुटुंबात जर प्रॉपर्टीचा वाद असेल तर तो वाढत असल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा