शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 1 मार्च ते 7 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 10:29 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष

 

व्यावसायिक आघाडीवर आपले प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील, परंतु अंतिम मुदत गाठण्यासाठी एखाद वेळेस अधिक मेहनत करण्याची तयारी सुद्धा ठेवावी लागेल. दरम्यान सरकारी प्रश्न,कायदेशीर बाबी ह्यात सकारात्मक परिणाम येण्याची शक्यता आहे. नवे धाडस करण्याची किंवा नोकरीत नवीन संधीचा लाभ घेण्याची मनात इच्छा होईल. आपण ह्या दिशेने पाऊल उचलण्यास हरकत नसली तरी विचारपूर्वक मार्गक्रमण करावे. पहिल्या दिवशी आपण स्वतःसाठी खर्च कराल, मात्र त्या नंतर प्राप्तीचे स्रोत वाढविण्यावर आपले लक्ष केंद्रित कराल व त्यामुळे आपला फायदा सुद्धा होऊ शकेल... आणखी वाचा

वृषभ 

संपर्कांवर आधारित कामात आठवड्याच्या सुरुवातीपासूनच अधिक लक्ष घालावे लागेल. ह्या व्यतिरिक्त नवीन लोकां बरोबर संवाद व जुन्या गिऱ्हाईकांशी किंवा सहकाऱ्यांशी पुन्हा संपर्क साधण्यास आपले प्राधान्य असेल. आठवड्याच्या मध्यास सकारत्मक वृत्तीमुळे आपल्या आरोग्यास निश्चितच फायदा होऊ शकेल. मात्र, त्या दरम्यान अनावश्यक खर्च टाळावेत. प्राप्तीत वाढ होण्यासाठी आपण सक्रिय राहिलात तरी त्याच्या फलिता बद्धल मनात काही शंका निर्माण होऊ शकते. व्यावसायिक अभ्यासक्रमाशी संबंधित विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्तम होऊ शकेल... आणखी वाचा

मिथुन

आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या दुपार पर्यंत आपल्या संततीशी संबंधित बाबीत सकारात्मक परिणामाची अपेक्षा आपण बाळगू शकाल. व्यावसायिक बाबतीत सुरुवातीस शांत राहावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस भागीदारी किंवा संयुक्त साहस करण्यास प्रतिकूल आहे. मात्र, आपण उत्तरार्धात प्राप्तीवर अधिक लक्ष केंद्रित करून कामात उत्तम कामगिरी करू शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात सामाजिक कार्यातील सक्रियतेमुळे आपणास फायदा होऊ शकेल... आणखी वाचा

कर्क

आपण सध्या कारकीर्दीस जास्त महत्व देत असल्याने आपल्या प्रियव्यक्तीस योग्य तितका वेळ देऊ शकणार नाही, व त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीस संबंधात असंतोष निर्माण झाल्याचे आपणास स्पष्टपणे जाणवेल. सुरवातीस संबंधात दुरावा निर्माण झाल्याचे सुद्धा जाणवू शकते. मात्र, आठवड्याच्या मध्यास आपला जोडीदाराकडे पुन्हा कल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात येईल. जी लोक आपणास मदत करण्यास नेहमीच तयार असतात व आपल्यात विशेष स्वारस्य दर्शवतात अशा लोकांशी संबंध निर्माण करण्यास आपण अधिक तत्पर राहाल... आणखी वाचा

सिंह

आठवड्याच्या सुरुवातीस व्यक्तिगत जीवनात सौहार्दता निर्माण करण्याकडे आपला कल होऊन प्रिय व्यक्तीशी सुद्धा संपर्क वाढवू शकाल. आपण जीवनास व संबंधास वेगळ्या दृष्टिकोनातून बघाल. पूर्वी ज्या समस्या आव्हानात्मक वाटत होत्या त्यांचे निराकरण आपल्या सकारात्मक वृत्तीमुळे होऊ शकेल. आठवड्याच्या मध्यास व्यावसायिक बाबींकडे अधिक लक्ष देऊ शकाल व त्यामुळे आपल्या कारकिर्दीत प्रगती साधण्यासाठी आपणास मदत होऊ शकेल. आपणास आरोग्य विषयक किरकोळ त्रास होण्याची शक्यता असली तरी परिस्थितीवर आपले नियंत्रण राहील... आणखी वाचा

कन्या 

आठवड्यात घरात एखाद्या मंगल कार्याचे आयोजन होईल किंवा आपण एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल व त्यात अनेक लोकांचा सहवास आपणास लाभल्याने आपले मन आनंदित होईल. ह्या व्यतिरिक्त सामाजिक क्षेत्रात आपली सक्रियता वाढून समाजाच्या कल्याणासाठी काही तरी करण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होईल. प्रेक्षणीय स्थळाच्या प्रवासाचे किंवा सहलीचे आयोजन करू शकाल. व्यावसायिक आघाडीवर सरकारी कार्यात यशस्वी व्हाल. वडीलधारी व पूजनीय व्यक्तींचा सहवास घडेल... आणखी वाचा

तूळ

आठवड्याच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत आपली प्रेमाची भावना उत्कट राहिल्यामुळे प्रियव्यक्तीसह आनंदात वेळ घालवू शकाल. ह्या व्यतिरिक्त सामाजिक प्रवृत्ती व मित्रांसह धावपळ करण्यात वेळ जाईल. मात्र, त्या नंतरच्या दिवसात काळजी घ्यावी लागेल. एखाद्या गोष्टीने आपल्या मनाची व्याकुळता वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत संबंधात व व्यावसायिक आघाडीवर एखादी अनिच्छनीय स्थिती निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या वाग्बाणाने स्वकीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

वृश्चिक 

आठवड्याच्या सुरुवातीस नोकरीत थोडा कार्यभार वाढेल, परंतु त्याने आपणास भविष्यात नक्कीच लाभ होऊ शकेल. आरोग्य मध्यम राहील. नोकरी - व्यवसायात पदोन्नतीची बातमी मिळेल. आपण जर विविध छंद जोपासलेत व जीवनावश्यक ज्ञानगोष्टीत स्वारस्य दाखविलेत तर लाभ होऊ शकेल. संततीची प्रगती होईल. वैवाहिक जोडीदाराच्या किंवा प्रियव्यक्तीच्या सहवासात आपण वेळ उत्तम घालवू शकाल. आपल्यात आपलेपणा चांगला राहील... आणखी वाचा

धनु 

आठवड्याच्या सुरुवातीस कुटुंबियांशी संबंधातील सलोखा व प्रियव्यक्तीचा सहवास आपणास आनंदित करेल. आपले वडिलधाऱ्यांशी संबंध सुधारतील व आरोग्य सुद्धा उत्तम राहील. दैनंदिन प्राप्तीत सुद्धा आपण समाधानी राहाल. आपल्या प्राप्तीची साधने सध्या चांगली फळे देतील. संततीचा अभ्यास, प्रवेश ह्यांच्यासह इतर कार्यांसाठी खर्च करण्याची तयारी ठेवावी. आठवड्याच्या मध्यास एखाद्या छोट्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. आर्थिक बाबतीत आपण अधिक जागरूक व्हाल. विरोधक व प्रतिस्पर्ध्यांवर आपण सहजपणे मात करू शकाल... आणखी वाचा

मकर ​​​​​​​

आठवड्यात एखाद्या प्रसंगामुळे भाग्यवृद्धी होऊन आपली प्रसन्नता वाढेल. विशेषतः परदेशाशी संबंधित असलेल्या व्यक्तींना परदेशातून चांगली बातमी मिळेल. परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींचा मार्ग मोकळा होईल किंवा त्या दिशेने प्रगती होईल. व्यावसायिक आघाडीवरील कामात आपणास कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रोत्साहन मिळाल्याने आपला उत्साह द्विगुणित होईल. व्यावसायिक कौशल्य व प्राप्तीमुळे आपल्या सामाजिक व कौटुंबिक प्रतिष्ठेत भर पडल्याने आपण खुश व्हाल... आणखी वाचा

कुंभ

आठवड्याच्या सुरुवातीस आपण मित्र, व्यावसायिक संबंध व कुटुंब ह्या सर्वांवर एकाच वेळी लक्ष द्याल व प्रत्येक आघाडीवर समतोल साधण्यात यशस्वी सुद्धा व्हाल. नवीन ओळखी वाढविण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी सुद्धा संबंध चांगले राहतील. नोकरीत आपल्या कामगिरीने वरिष्ठांचे लक्ष वेधून घेऊन पदोन्नतीचा मार्ग मोकळा कराल. विदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांचा मार्ग मोकळा होऊ लागेल. विवाहेच्छुकांना जोडीदाराचा शोध घेण्यात यश प्राप्त होईल... आणखी वाचा

मीन

आठवड्याच्या सुरुवातीस आपण प्राप्तीवर अधिक लक्ष केंद्रित कराल व त्याच बरोबर आर्थिक भविष्य सुरक्षित राहण्यासाठी काही योजना आपल्या मनात साकारल्या जातील. अशा योजना साकारण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. मात्र, आपणास दूरवरचा विचार करून गुंतवणूक करावी लागेल हे लक्षात ठेवावे. नोकरीत वरिष्ठांशी विचार - विनिमय करताना आपला दुराग्रह सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. व्यवसायात सुद्धा एखादा लाभदायी सौदा होऊ शकेल. सध्या आपण व्यावसायिक कामे उत्साहात व जलदगतीने कराल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष