शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

साप्ताहिक राशीभविष्य - ०६ फेब्रुवारी २०२२: नोकरीत बदलीची शक्यता, कामाचा ताण वाढेल; कसा असेल हा आठवडा, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 08:01 IST

Horoscope : ६ फेब्रवारी ते १२ फेब्रुवारी, जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - आर्थिक लाभ होईल. मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात खर्च जास्त होईल. काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. नोकरीत कटकटीचे प्रसंग येतील. टीप- सोमवार,मंगळवार, शुक्रवार,शनिवार चांगले दिवस.

वृषभ- समिश्र ग्रहमान आहेत. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. काही कारणाने गैरसमज होतील. तणाव निर्माण होतील. तरुण वर्गाने चांगल्या मित्रांसोबत रहावे. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मिथुन - अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. महत्वाच्या कामात यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. अडलेली कामे मार्गी लागतील. भरभराट होईल. अचानक मोठे लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. आपली माहिती अनोळखी लोकांना सांगू नका. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

कर्क - महत्वाच्या कामांना गती मिळेल. अडचणी दूर होतील. काही ठिकाणी थोडे संयमाने वागणे आवश्यक आङे. आर्थिक अडचणीवर तोडगा निघेल. कार्यात भाग घ्याल. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.

सिंह - नवीन नोकरीच्या शोधात असेल तर संधी मिळेल. नोकरीत महत्वाच्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. घरी पाहुणे येतील. थोडा तणाव राहील. मानसन्मान मिळेल. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कन्या - नोकरीत वादाचे प्रसंग येतील. मात्र संयम ठेवा. काहींना बदलीला समोर जावे लागेल. महत्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवासाचे योग येतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांशी संवाद साधला पाहिजे. टीप- रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ- संमिश्र ग्रहमान असल्याने काही त्रासदायक घटना घडतील. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन संधी मिळेल. व्यवसायात स्पर्धा राहिल. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

वृश्चिक - भाग्याची साथ राहिल. भेटवस्तू मिळतील. काहींना अलभ्य लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कामात उत्साह राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. प्रवास कार्य साधक ठरतील. टीप- रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

धनु - जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काही कारणाने जवळच्या लोकांशी गैरसमज होतील. नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. व्यवसायात भरभराट होईल. संयमाने वागल्यास अडचणी हळूहळू कमी होतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

मकर - घरात आनंदी वातावरण राहिल. नोकरीत बदली होऊ शकते. मुलांच्या मनातील भावना समजून घेणे आवश्यक आहे. काही अडचणी येतील. फसव्या योजनांपासून सावध राहा. आर्थिक आवाक चांगली राहिल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार शुभ दिवस

कुंभ- नोकरीत बदलीची शक्यता. कामाचा ताण वाढेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रेम प्रकरणातून यश मिळेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. महत्वाचे निरोप येतील. टीप- विवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मीन- आर्थिक आवाक चांगली राहिल. मनासारखी धनप्राप्ती होईल. भावंडांशी वाद होतील. आर्थिक अडचणींमुळे अडथळा येऊ शकतो. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.

 -विजय देशपांडे(ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष