शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 29 मे 2021; 'या' राशिच्या व्यक्ती प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवतील, प्रत्येक कामात यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 07:36 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष -  आज तुम्हाला श्रीगणेश रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. जर तुम्ही रागावर ताबा ठेवला नाही तर काम आणि चांगल्या संबंधात बिघाड येईल. मानसिक व्यग्रता आणि मनाची बेचैनी यामुळे तुमचे कामात लक्ष लागणार नाही. आणखी वाचा

वृषभ -  शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर लागेल व त्यामुळे निराश व्हाल. नवीन काम सुरू करू नका. योग्य अयोग्य बघूनच खाणे पिणे ठेवा. आज कामाचा व्याप वाढेल. एखाद्या कामाच्या मागे लागून सुख शांती गमावून बसण्यापेक्षा योग, ध्यान, आध्यात्मिकता यात मन गुंतवा.आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्या बरोबर एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. वाहनसौख्य मिळेल. तुमच्या मान- सन्मानात व लोकप्रियतेत वाढ होईल. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश म्हणतात की व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचा आज तुमच्या बरोबरचा वेळ खूप आनंदात जाईल. शत्रूवर विजय मिळेल. चालू कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. स्नेही, मित्र यांच्या गाठीभेटी होतील. तब्येत चांगली राहील. तरीही रागावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य टिकेल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस प्रतिकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर भांडण होईल किंवा मतभेद होतील. स्थावर संपत्तीच्या कामात सावध राहा. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी असेल. आपापसातील संबंध सुधारतील. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आपल्या वागण्यापातून कोणाचे मन दुखावले जाईल. म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा. स्वास्थ्य बिघडेल, मन उद्विग्न होईल. विद्यार्जनामध्ये विद्यार्थ्यांना अडथळा येईल. आणखी वाचा

धनु - निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मीची कृपा राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. निकटवर्गीयांकडे शुभ प्रसंगानिमित्त हजेरी लावाल. यश-कीर्ती वाढीस लागेल. आणखी वाचा

मकर - आज मन अस्वस्थ राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च होईल. स्वकीय आणि मित्रांबरोबर पटणार नाही. धनहानी आणि मानहानीची शक्यता आहे. कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल. वाणीवर ताबा ठेवा. आणखी वाचा

कुंभ - आज आपणांस मिळणार्‍या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल असे श्रीगणेश सांगतात. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. व्यापारी वर्गाला व्यापारात फायदा होईल. उत्पन्न वाढेल. प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा

मीन - व्यवसाय धंद्यात लाभाचा दिवस. आपल्या यशामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. पदोन्नतीचे योग आहेत. पित्याकडून लाभ. कौटुंबिक वातावरण आनंदाचे. मान प्रतिष्ठा उंचावेल. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१