आज जन्मलेली मुलंआज 19 क. 42 मि. पर्यंत मुले मिथुन राशीत प्रवेश करतील. पुढे कर्क राशीची मुले असतील. प्रगल्भ विचार आणि वेगवान प्रवाह यातून कार्यमार्ग स्वीकारले असता त्यातून काही प्रांतात प्रभाव निर्माण करु शकाल. परिचय मोठे राहातील. माता-पित्यास शुभ. मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर. कर्क राशी ड, ह अद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी
शुभाशुभ चौघडीदिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराचा सूर्योदय-सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्यादयापासून पुढे करावा. दिवसा-सकाळी : 6 ते 7.30 रोग, 7.30 ते 9 उद्वेग, 9 ते 10.30 चंचल, 10.30 ते 12 लाभ, 12 ते 1.30 अमृत, 1.30 ते 3 काल, 3 ते 4.30 शुभ, 4.30 ते 6 रोग.रात्री : 6 ते 7.30 काल, 7.30 ते 9 लाभ, 9 ते 10.30 उद्वेग, 10.30 ते 12 शुभ, 12 ते 1.30 अमृत, 1.30 ते 3 चंचल, 3. ते 4.30 रोग, 4.30 ते 6 काल.
दिनविशेष1754 - राष्ट्रीय वृत्तीचे वऱ्हाडातील वकील, नामांकित वक्ते गणेश श्रीकृष्ण तथा दादासाहेब खापर्डे यांचा जन्म.1859 - उद्योगपती दोराबजी जमशेद टाटा यांचा जन्म.1908 - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांचा जन्म.1910 - इतिहास संशोधक व साहित्यिक सेतू माधवराव श्रीनिवास पगडी यांचा जन्म.1925 - गूढ कथा लेखक नारायण धारप यांचा जन्म1972 - भारतीय मल्ल दिलीपसिंह राणा तथा द ग्रेट खली यांचा जन्म.1976 - सुप्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त भारतीय पार्श्वगायक मुकेश यांचे अमेरिकेत निधन.
पंचांगमंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2019- भारतीय सौर 5 भाद्रपद 1941- मिती श्रावण वद्य द्नादशी 26 क. 33 मि.- पुनर्वसू नक्षत्र 25 क. 13 मि., मिथुन चंद्र 19 क. 42 मि.- सुर्योदय 06 क. 24 मि., सूर्यास्त 06 क. 57 मि.- भागवत दकादशी