आजचं पंचांगरविवार 1 डिसेंबर 2019भारतीय सौर 10 मार्गशीर्ष 1941मिती मार्गशीर्ष शुद्ध पंचमी 19 क. 13 मि.उत्तराषाढा नक्षत्र 09 क. 40 मि., मकर चंद्र सूर्योदय 06 क. 56 मि., सूर्यास्त 05 क. 59 मि.
आज जन्मलेली मुलंमकर राशीत जन्मलेली आजची मुलं रविचंद्र शुभयोगामुळे कार्यप्रांतात स्वत:चा प्रभाव निर्माण करू शकतील. त्यात शिक्षणाचा समावेश राहील. व्यापार आणि अधिकार यातूनही प्रगती होईल. संयम मात्र आवश्यक. मकर राशी 'ज', 'ख' आद्याक्षर.- अरविंद पंचाक्षरी दिनविशेषएड्स प्रतिबंधक दिन1885- साहित्यिक गांधीवादी देशभक्त आचार्य काका कालेलकर यांचा जन्म1909- मराठी कवितेस नवे वळण देणारे बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म1912- पत्रकार, कथाकार, समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म1980- भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफचा जन्म1985- स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचं निधन1988- प्रा. गं. बा. सरदार यांचं निधन1990- मुत्सद्दी राजकारणी विजयालक्ष्मी पंडित यांचं निधन