शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Today's horoscope: आजचे राशीभविष्य, २० मे २०२२; दोन राशींच्या व्यक्तीना चैनीच्या वस्तू खरेदीचा मोह होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 07:29 IST

Today's horoscope, May 20, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...   

मेष- घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत काही अनपेक्षित बदल होतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक राहील. कायदेविषयक सल्ला मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही.

वृषभ- नशिबाची साथ मिळेल. अडचणी दूर होतील. दगदग कमी होईल. काहींचे पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक उलाढाली जपून करा. जीवनसाथी चांगली साथ देईल. तुमचे बोलणे परिणामकारक ठरेल.

मिथुन- महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. वाहने जपून चालवा. प्रवास शक्यतो टाळा. कामे झालीच पाहिजेत असा अट्टाहास करू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.

कर्क - ग्रहमान सामान्य राहील. मात्र किरकोळ अडचणी आपोआप दूर होताना दिसतील. त्यामुळे मनात सकारात्मक विचार राहतील, जीवनसाथी चांगली साथ देईल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. आर्थिक आवक चांगली राहील.

सिंह- आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. झेपतील तेवढीच कामे अंगावर घ्या. काहींना अचानक धनलाभ होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमचे वर्चस्व राहील. मुलांशी संवाद साधला पाहिजे.

कन्या- मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. त्यांना काय हवे नको ते विचारा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. एखाद्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते. थोडे तारतम्याने वागणे आवश्यक आहे.

तूळ- नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन संधी मिळेल. एखाद्या उपक्रमात सक्रिय सहभाग राहील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळेल. घरी पाहुणे येतील. मुलांची काळजी वाटेल. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळले पाहिजे.

वृश्चिक - व्यवसायात सतत व्यस्त राहाल. काहीना कामानिमित्त प्रवास घडून येईल. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. विचारपूर्वक गुंतवणूक केली पाहिजे. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.

धनू- महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मात्र मनात थोडी धाकधूक राहील. थोडे सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. आर्थिक आवक चांगली राहील. आईकडून किंवा आजोळहून फायदा होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. धाडसी निर्णय घ्याल.

मकर- महत्त्वाचे काम हाती घेण्यास हरकत नाही. अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. भावंडांच्या भेटी होतील. त्यांची ख्यालीखुशाली कळेल. व्यवसायात विक्री चांगली राहील, मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. नावलौकिक वाढेल.

कुंभ- महत्वाच्या कामात अडचणी येतील. एखादे काम होण्यात अडथळा येत असेल, तर सतत पिच्छा पुरवू नका. कधी कधी संयम ठेवलेला बरा असतो. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. नोकरीत बढतीसाठी अनुकूल परिस्थिती राहील.

मीन- नोकरीत कामाचा ताण कमी होईल. घरातील कामे करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक आवक राहील. विविध प्रकारच्या सोयी-सुविधा मिळतील. जीवनसाथी चांगली साथ देईल.

- विजय देशपांडे, ज्योतिष विशारद 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष