शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Today's horoscope: आजचे राशीभविष्य, १९ मे २०२२; डोक्याला वैताग वाढेल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 07:32 IST

Today's horoscope, May 19, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...  

मेष- अतिशय अनुकूल ग्रहमान राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. तुमचे कौतुक होईल. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे.

वृषभ- नोकरीत तुमचा दबदबा राहील, तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकलणे ठीक राहील. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. वेळ आणि पैसा खर्च होईल. त्यामुळे थोडा संयम ठेवलेला बरा. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील.

मिथुन- चांगल्या लोकांच्या सहवासात याल. त्यांची मदत मिळेल. जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. त्यासाठी अनेकांचे सहकार्य मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महत्त्वाचे निरोप येतील. आत्मचिंतन करण्यासाठी वेळ मिळेल.

कर्क- मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्याचे कौतुक होईल. नोकरीत मोठी संधी मिळेल. त्यामुळे कामाचा ताण वाढेल; पण फायदा होणार असल्याने ताण जाणवणार नाही. काही अडचणी बोलून दूर करा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह-  ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. महत्त्वाचे काम सहजासहजी मार्गी लागेल. कामाचा ताण निघून जाईल. जी काही उरलेली कामे असतील ती कुशलतेने पूर्ण कराल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. मुले प्रगती करतील. आवक चांगली राहील.

कन्या - नोकरीत कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. काहींच्या कामाचे स्वरूप बदलेल. व्यवसायात भरभराट होईल. नवीन ओळखी होतील. कुणी काही प्रस्ताव किंवा योजना सांगितली तर विचार करून निर्णय घ्या.

तूळ - व्यवसायात साधक बाधक परिस्थिती राहील. काही फायदे होतील, तर काही अनावश्यक खर्च होइल. भावनेच्या भरात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांच्या संपर्कात राहाल. कामानिमित्त कार्यरत राहावे लागेल. थोडा स्वत:साठी वेळ काढा.

वृश्चिक - एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. आवडते पदार्थ ताटात दिसतील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. अनेक मार्गानी लाभ होईल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील.

धनू- नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या सल्ल्याचा इतरांना फायदा होईल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी वेळ द्याल. कामे आटोक्यात येतील. हलके वाटेल.

मकर- महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य राहील. एखादा महत्त्वाचा निरोप येईल. काहींना प्रवास घडून येईल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. व्यवसायात विक्री चांगली राहील. डोक्याला वैताग वाढेल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका.

कुंभ- नोकरीत तुमचे पारडे जड राहील. अनुकूल घटना घडतील. विविध मार्गानी धनप्राप्ती होईल. उत्तम प्रवास घडतील. जवळच्या लोकांच्या सहवासात याल. चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेता येईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

मीन - नोकरीत कामाचा ताण राहील, सतत कार्यरत राहावे लागेल. जोडीदाराची चांगली साथ राहील. कुणाचे मन दुखावले जाईल, असे बोलू नका. त्यांच्यासाठी खस्ता खाव्या लागतील; पण त्याचे कुणाला महत्त्व वाटणार नाही.

-(विजय देशपांडे, ज्योतिषविशारद) 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष