मेष – अनेक कामं सहजरित्या पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. मन प्रसन्न राहील. भागीदारी व्यवसायात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. महिला आज घरांतील कामात व्यस्त राहतील. दिवस आनंददायी जाईल.
वृषभ – आजचा दिवस तुम्हाला कामात यश देणारा ठरेल. तुमची मेहनत आणि भाग्याची साथ उत्तम राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मेहनतीच्या जोरावर आपल्या कार्यक्षेत्रात यश संपादन कराल. जमिनीच्या व्यवहाराचे निर्णय तुमच्या बाजूनं असतील. सांभाळून खर्च करा. वाहन चालवताना सावधानी बाळगा.
मिथुन – रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम राहील. नोकरी-व्यवसायात उत्तम यश मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमच्या बोलण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत मिळेल. यश मिळवण्यासाठी मेहनत कराल.
कर्क – भाग्याची साथ लाभेल. मित्रपरिवारासह चांगला वेळ घालवाल. कोणत्याही नव्या व्यावसायिक योजनेवर काम करण्यासाठी उत्तम वेळ. विचारपूर्वक कामे करा. तरुणांना उत्तम यश मिळेल. ग्रहमानाची साथ राहील.
सिंह – आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा राहील, ज्यामुळे तुमचे मित्र आणि नातेवाईकांशी संबंध अधिक घट्ट होतील. आज तुमच्या घरातील काही शुभ कार्य पूर्ण होतील. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल.
कन्या – आज भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला दिवस जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न राहील. गुरु आणि वडिलधाऱ्यांबद्दल आदराची भावना वाढेल. तुमच्या मधूर बोलण्यामुळे इतरांना आकर्षित कराल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल.तूळ – शत्रूंचा पराभव कराल. तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. कुटुंब आणि मित्रांसोबत दिवस घालवाल. लोकांच्या आदरास पात्र ठराल. आरोग्यासाठीही आजचा दिवस चांगला आहे. गोडधोड खाण्यास मिळेल.
वृश्चिक – कामकाजाच्या दृष्टीनं आजचा दिवस उत्तम आहे. मित्राच्या मदतीनं तुम्हाला आखलेल्या योजनेत यश मिळेल. आर्थिक स्थिती आवक उत्तम राहील. खर्चाचं प्रमाण वाढेल. हाती घेतलेलं कार्य पूर्ण कराल.
धनू – दिवसाची सुरूवात उत्तम होईल. हाती घेतलेलं काम यशस्वीरित्य पूर्ण कराल. भागीदारी व्यवसायातून धनलाभ संभवतो. सकारात्मक विचार ठेवा. व्यापारी वर्गाला विशेष लाभ होतील. धनलाभाचेही योग संभवतात.
मकर – कामात यश मिळेल. इतरांनाही मार्गदर्शन कराल. नवे मित्र तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत करतील. भाग्याची साथ मिळेल. वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होईल. आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.
कुंभ – तुमचं व्यवहारातील परिवर्तन अन्य लोकांच्या चर्चेचा विषय बनेल. आरोग्याची काळजी घ्या. मन लावून काम पूर्ण करा. धनलाभाचे योग संभवतात. दिलेलं वचन पूर्ण कराल. आर्थिक आवक चांगली राहील.
मीन – दिवसाची सुरूवात सकारात्मक बातमीनं होईल. संमिश्र ग्रहमान राहील. आर्थिक आवक चांगली राहील. कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. नवी खरेदी कराल, धनलाभही संभवतो.