शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 30 नोव्हेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 06:46 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

मेष - कोणत्याही प्रकारच्या संकटात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद घालत बसणे हिताचे नाही. दैव साथ देत नाही असे वाटेल. कामात त्वरित यश मिळणार नाही. आणखी वाचा

वृषभ - आपला हळवेपणा आपणाला बेचैन करील असे श्रीगणेश सांगतात. शरीर स्वास्थ्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मिथुन - आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजनाच्या 'मूड' मध्ये राहाल. मित्रांसह प्रवास- सहलीचे योग येतील. रुचकर खाणे आणि उंची वस्त्रे व दागिने उपलब्ध होतील. आणखी वाचा

कर्क - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील, असे श्रीगणेश सांगतात. माहेरहून आनंदाच्या वार्ता मिळतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

सिंह - प्रणयासाठी दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता आणि उत्साह जाणवेल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेशांचे सांगणे आहे की आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी आणि चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर अपमान होणार नाही याची काळजी घ्या. धनहानी संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

तूळ - नवे कार्य हाती घेण्यास दिवस शुभ आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मनात औदासिन्य पसरेल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

वृश्चिक - ठरवलेले काम पूर्ण न झाल्याने निराशा येईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाचा अंतिम निर्णय घेऊ नये असा सल्ला श्रीगणेश देतात. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसमवेत आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस आपणासाठी शुभ फलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. कामेपूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्साही आणि ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहने कराल. आणखी वाचा

मकर - बोलणे आणि वागणे यामुळे भांडण होणार नाही याची दक्षता घ्या. संतापाचे प्रमाण वाढेल. पण कोणाशी वाद वा मतभेद होऊ देऊ नका. मन व्यग्र राहील. अध्यात्माच्या आधाराने मन शांत ठेवा. दुपारनंतर स्फूर्ती आणि उत्साह वाढेल. आणखी वाचा

कुंभ - सर्व दृष्टींनी आजचा दिवस लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल आणि परिणाम स्वरूप मान प्रतिष्ठा वाढेल. विवाहोत्सुकांना मनासारखा जोडीदार लाभेल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपणाला सर्व दृष्टींनी लाभदायक आहे. परोपकाराचे कार्य हातून घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. उच्च अधिकारी वर्ग आनंदाने आपल्या कामाचे कौतुक करतील. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष