शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Today's horoscope: आजचे राशीभविष्य, २१ मे २०२२; कन्या राशीसोबत आज धोका होण्याची शक्यता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 07:37 IST

Today's horoscope, May 21, 2022: कसा असेल तुमचा आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या...   

मेष- जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासमवेत वेळ मजेत जाईल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. एखाद्या निर्णयामुळे विचलित होऊ नका, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नाही तर पैशाचा अपव्यय होईल, योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल.

वृषभ- ग्रहमान अनुकूल राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. तुमच्या सोयीनुसार लोक वागतील, योग्य लोकांच्या सहवासात याल, प्रवास होईल. प्रवास कार्य साधक ठरेल, जीवनसाथीशी सूर जुळतील. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या.

मिथुन- नोकरीत सामान्य परिस्थिती राहील, घरातील सदस्यांशी समन्वय राहील, महत्त्वाचे निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला घ्या महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. दगदग होईल अशी कामे करू नका.

कर्क- मन प्रसन्न राहील. अनावश्यक खर्च होतील. विविध प्रकारचे आर्थिक लाभ होतील, लोकांचे सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील, महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल.

सिंह- नोकरीत कामाचा ताण कमी होईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल, काहीना चांगली संधी मिळेल. मुले अभ्यासात प्रगती करतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. प्रवासात दगदग होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

कन्या- आर्थिक उलाढाली जपून करा. एखादी व्यक्ती अपेक्षाभंग करेल. तुमचे व्यवहार सर्वांना सांगू नका. कदाचित त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. विशेषतः क्रेडिट कार्ड, पासवर्ड इत्यादी ऑनलाईन व्यवहाराची माहिती फोनवरून देऊ नका.

तूळ - चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हलका आहार घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या मित्रांशी गप्पाटप्पा होतील.

वृश्चिक- कामाचा ताण राहील. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. मुले अभ्यासात प्रगती करतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. फार मोठा धाडसी निर्णय घेताना जाणकारांचा सल्ला घ्या.

धनू- धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. अचानक मोठा लाभ होईल, घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. सदस्याशी समन्वय राहील. मनासारखे भोजन मिळेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. आत्मविश्वासाने वाटचाल सुरु राहील.

मकर- मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल. पर्यटन अथवा धार्मिक स्थळांना भेटी देणे या निमित्ताने प्रवास होतील. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. नातेवाईक, इष्टमित्र भेटतील.

कुंभ- आर्थिक आवक बऱ्यापैकी राहील. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील, अपेक्षित कामे होण्यात अडथळा येऊ शकतो. दिरंगाई होत असल्याने चिडचिड होईल. सकारात्मक विचार असू द्या.

मीन- घरी पाव्हण्या रावळ्यांचा आदळ राहील. त्यांची सरबराई करण्यात व्यस्त राहाल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. वाहन सुख मिळेल. प्रवासाचे योग येतील.

- विजय देशपांडे, ज्योतिष विशारद

टॅग्स :Astrologyफलज्योतिष