शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
2
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
3
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
4
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
5
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
6
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
7
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
8
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
9
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
10
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
11
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
12
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
13
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
14
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
15
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
16
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
17
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
18
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
19
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

आजचे राशीभविष्य - ५ मार्च २०२२; नवीन गुंतवणूकीची संधी, तर नोकरीतही अनुकूल परिस्थिती राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 07:38 IST

Rashi Bhavishya, Today's Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

मेष – काही कारणानं गैरसमज होतील. अडचणीतून संयमाने मार्ग काढण्याची गरज आहे. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवायला पाहिजे. नोकरीत मनाचा तोल ढळू देऊ नका.

वृषभ – मन प्रसन्न राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. उत्तम संधी चालून येतील. मनासारखे भोजन मिळेल. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होील. आर्थिक आवक चांगली राहील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च होईल.

मिथुन – आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घ्याल. घरात थोडी कुरबुर होईल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कुणाचा अपमान होईल, असं बोलू नका. खर्चाचे प्रमाण वाढते राहील.

कर्क – आपले अंदाज बरोबर ठरतील. त्यामुळे स्वत:ला आणि इतरांनाही त्याचा फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. कामानिमित्त दगदग होईल. व्यवहार जपून करा. नातेवाईकांसाठी घटावे लागेल. मित्र मैत्रिणीच्या सहवासात मजेत वेळ जाईल.

सिंह – कामाचा ताण राहील. मन अस्वस्थ राहील, आरोग्याची काळजी घ्या. आपले कोण परके कोण यातील फरक ओळखा. बोलण्यात गोडवा असू द्या. अन्यथा जवळचे लोक तुटतील. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. 

कन्या – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. नोकरीत सहकऱ्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागेल. कामाचे नियोजन नीट करा. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.

तूळ – लोकांना दुखवू नका. आपल्या बोलण्याचा विपर्यास केला जाऊ शकतो. त्यामुळे संयमाने बोलणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. जर काम पुढे ढकलता आले तर बरे राहील. मित्र मैत्रिणीच्या सहवासात मौजमजा कराल.

वृश्चिक – अचानक धनलाभ होील. मात्र, खर्च करण्याकडे कल राहील. शुभकार्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. कुणी तुम्हाला मोहात अडकवण्याचा प्रयत्न करेल. थोडे सावध राहा. घर व नोकरी यात तारांबळ उडेल. 

धनू – आर्थिक व्यवहार जपून करा. कोणी फसवणार नाही याची काळजी घ्या. उधार देताना विचार करुन द्या. कौटुंबिक वादाची ठिणगी पडू शकते. एखाद्या वादात मधस्थी करावी लागेल. कामाची जबाबदारी वाढेल. दगदग, धावपळ होईल. आरोग्याची काळजी घ्या.

मकर – व्यवसायात भरभराट होईल. नवीन गुंतवणूक केली जाईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल. विविध प्रकारचे लाभ होतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. सर्वांशी समन्वय राहील.

कुंभ – मनात काळजीचे विचार राहतील. कामाचा ताण वाढेल. वादविवाद टाळलेले बरे राहीलय आर्थिक आवक सामान्य राहील. अनावश्यक खर्चाला आवर घाला. कायद्याची बंधने पाळा. महत्त्वाचे निर्णय एकट्याने घेऊ नका.

मीन – जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. जवळपासच्या सहलीला जाल. लोकांच्या प्रशंसेस पात्र ठराल. विविध प्रकारचे फायदे होतील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष