शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 21 मार्च 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 07:17 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. आणखी वाचा.

वृषभ - आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात नवीन विचारधारा अंमलात आणाल. आळस आणि व्यग्र असल्याने तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा.

मिथुन - नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. वाहन चालवताना दुर्घटनेपासून जपा. अचानक खर्च उदभवतील. काही कामास्तव बाहेरचा प्रवास घडेल. आणखी वाचा.

कर्क - गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होण्याचे योग आहेत.  आणखी वाचा.

सिंह - आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. योग्य कामी पैसा खर्च होईल. परदेशात स्थिती व्यावसायिकांकडून लाभ होण्याची शक्यता. आणखी वाचा.

कन्या - आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. अलंकार खरेदी कराल. कलेत आवड राहील. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आणखी वाचा.

तूळ - आजचा आपला दिवस मध्यम फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. शरीरात उत्साह आणि मनात आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. आणखी वाचा.

वृश्चिक - आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊबंदांचे वर्तन सहकार्यपूर्ण राहील. प्रतिस्पर्धी पराभूत होतील. आणखी वाचा.

धनु - आप्त स्वकीयासोबत मतभोद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात. आरोग्य ठीक राहील. अध्यात्मासाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक फायदा होईल. आणखी वाचा.

मकर - आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात. उदयोग व्यवसायात अनुकूल वातावरण. सगळी कामे सहज पूर्ण होतील. आणखी वाचा.

कुंभ - धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल. अपघात किंवा शल्यचिकित्सा यापासून सांभाळून राहा. आणखी वाचा.

मीन - व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. प्रवास घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष