शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

आजचे राशीभविष्य - २२ जुलै २०२१; आजचा दिवस मिश्र फलदायी, व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 07:32 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्र फलदायी राहील. अस्वास्थ्य आणि कटकटीचा अनुभव येईल. शरीरात आळस आणि थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाटेल आणि त्यामुळे कामे बिघडतील. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करा. अधिक वाचा

वृषभ - आजचा दिवस काळजीपूर्वक राहा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. नवीन कार्याचा आरंभ करू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा आणि मानसिक व्यथा अनुभवाल. अधिक वाचा

मिथुन - दिवस आनंदात आणि भोग विलासात जाईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी भेट होईल. मित्र आणि प्रिय व्यक्तींसमवेत मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल व परिधान करण्याची संधी मिळेल. अधिक वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज दिवस चांगला जाईल. घरात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. तब्बेत चांगली राहील. कुटुंबीयांसमवेत आनंदात वेळ जाईल. अधिक वाचा

सिंह - आजचा दिवस आनंदात जाईल. अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलस्वरूप होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील. संततीच्या दृष्टीने प्रगतीच्या वार्ता मिळतील. अधिक वाचा

कन्या - आजचा दिवस आपणाला चांगला नाही असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवा. अधिक वाचा

तूळ - आजचा दिवस शुभ फलप्राप्तीचा आहे असा संकेत श्रीगणेश देतात. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घरविषयक प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया धार्मिक ठिकाणी जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या वार्ता मिळतील. अधिक वाचा

वृश्चिक - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस साधारणच आहे. नाहक खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज दूर करा. शारीरिक त्रास आणि मनात मरगळ राहील. अधिक वाचा

धनु - आज धार्मिक प्रवास होईल असे संकेत श्रीगणेश देतात. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ असेल ज्यामुळे उत्साही व आनंदी असाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. अधिक वाचा

मकर - आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. कोर्ट कचेरी संबंधी कामे निघतील. व्यावसायिक कामात विघ्न येतील. मित्रांच्या प्रतिष्ठेची हानी होईल. उत्साह आणि प्रसन्नता नाहीशी होईल. अधिक वाचा

कुंभ - आजचा दिवस फायदयाचा आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात आज लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळे आनंद होईल. त्यांच्या बरोबर प्रवासही ठरवाल. अधिक वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा जाईल. कामे यशस्वी होतील आणि वरिष्ठ अधिकारी संतुष्ट असतील त्यामुळे आनंदी दिवस जाईल. व्यापार्‍यांच्या व्यापारात वाढ होईल. वडील आणि वाडवडील यांच्याकडून फायदा होईल. अधिक वाचा