शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

आजचे राशीभविष्य - 27 जानेवारी 2021; मित्र, स्त्रीवर्ग आणि थोरामोठ्यांकडून लाभ होतील, नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 07:41 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश म्हणतात की, विचारांची अस्थिरता अडचणीत आणेल. नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी चांगला दिवस आहे. आणखी वाचावृषभ - मनाची द्विधा अवस्था ठोस निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्षात पडण्याचा संभव आहे. लेखक, कारागिर, कलाकार यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. वाकचातुर्य आज तुमचे काम यशस्वी करेल व दुसर्‍याला मोहून टाकेल. आणखी वाचामिथुन - आजचा दिवस लाभदायक जाईल अशी आशा करू शकता. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र नातलग यांच्याबरोबर उत्तम जेवणाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ मिळेल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचाकर्क - शरीर आणि मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा निर्णय घ्यायला अतिशय कठिण करून सोडेल. कुटुंबीया बरोबर मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची चिंता लागून राहील. आणखी वाचासिंह - श्रीगणेश म्हणतात की आज आपल्याला विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गहाळ राहिलात तर लाभापासून वंचित राहाल, तिकडे लक्ष द्या. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरी व्यवसायात पदोन्नतीचा संभव आहे. आणखी वाचाकन्या - नवीन काम सुरू करायला निर्मित योजना अमलात आणायला आज उत्तम दिवस आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरदारांची पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात ताळ- मेळ असेल. आणखी वाचातूळ - दूरचा प्रवास किंवा धार्मिक स्थळाला भेट द्याल. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरीही संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. नोकरी करणार्‍यांना वरिष्ठ किंवा सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचावृश्चिक - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस सावधानीपूर्वक व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अनैतिक आचरण तुम्हाला अडचणीत आणतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहण्याचा व नवीन संबंध विकसित करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. दुर्घटनेपासून दूर राहा. आणखी वाचाधनु - बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य या साठी शुभ दिवस आहे. मनोरंजन, प्रवास, मित्राबरोबर भेटी, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्न लिंगीया बरोबर जवळीक या गोष्टी आजचा दिवस आनंदित बनवतील. भागीदारीत फायदा होईल. आणखी वाचामकर - श्रीगणेशांच्या कृपेने व्यापार धंद्यात वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस असल्यामुळे पैशाच्या देवाण घेवाणीत सरळपणा राहील. कुटुंबात सुख शांती नांदेल. कार्यकर्ते तसेच आपल्यावर अवलंबीत लोकांचे सहकार्य मिळेल. मातृघराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. आणखी वाचाकुंभ - आज तुम्ही संतती व स्वतःचे स्वास्थ्य या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. प्रवासात अडचणी येतील. आणखी वाचामीन - शारीरिक व मानसिक भय वाटेल. कुटुंबियांबरोबर वाद-विवाद होईल. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे तुमचा उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन आणि कीर्ती यांची हानी होईल. स्त्रीवर्ग तसेच वाणी यापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष