शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आजचे राशीभविष्य - 19 मे 2021; 'या' राशीच्या लोकांची जुनी येणी वसूल होतील, आर्थिक आवक चांगली राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 08:24 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

 मेष - धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घ्या. काही अनुकूल घटना घडलीत महत्वाचे निरोप येतील. मुलांना अपेक्षित यश मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. जोडिदाराशी सबुरीने घ्या.

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभाची शक्यता. परंतु दुपारनंतर स्थिती एकदम विचित्र होईल. खर्च वाढेल आणि कामात अपयश येण्याचे योग आहेत. आणखी वाचा

मिथुन -  घरात तुमचे ऐकले जाईल. समाजसेवा घडेल. एखाद्या प्रकल्पासाठी काम कराल. त्यासाठी नीट नियोजन करावे. नोकरीत प्रगती होईल. जुनी येणी वसूल होईल. आर्थिक आवक चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधीची कामे होतील. भावंडांना समजून घ्या.

कर्क -  आनंददायी दिवस आहे. हाती घेतलेले काम तडीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. भाऊ बहीण यांच्यासाठी वेल द्याल. व्यवसायात तुमचे अंदाज खरे ठरतील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. शेतीच्या कामासाठी वेळ द्याल.

सिंह - आवडत्या छंदासाठी वेळ द्याल. दगदग धावपळ होईल. थोडा आराम करणे आवश्यक आहे. जोडीदाराची साथ मिळेल. इतरांच्या कामात दखल देऊ नका. मनावरचा ताण हलका होईल. फक्त 'काम एके काम' असा खाक्या न ठेवता थोडा विरंगुळा वाटेल याकडे लक्ष द्या.

कन्या- नशिबाची साथ राहील. हातून समाजसेवा घडेल. नावलौकिक होईल, नोकरीत जबाबदारी वाढेल. आर्थिक आवक चांगली राहील. खर्च पण वाढेल. थोडा मनस्ताप होऊ शकतो. काही जण धार्मिक कार्यात सहभागी होतील. काहींना मित्रांकडून बोलावणे येईल .

तूळ -  गृहसौख्यात वाढ होईल. जवळचे लोक नातेवाईक भेटतील. व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नका. नोकरीत प्रगती होईल. समाजसेवेसाठी पुढाकार घ्याल. काहींना मानसन्मान मिळेल. नोकरीत मनासारखे बदल होतील. पैशांची आवक चांगली राहील.

वृश्चिक -  अडकलेली कामे मार्गी लागतील. विविध मार्गांनी पैसे मिळतील. कागदपत्रांची पूर्तता होईल. ओळखीचा फादा होईल. काहींना जवळपासचा प्रवास करावा लागेल. प्रवासात अनोळखी लोकांशी वाद घालू नका. हातून दानधर्म पूजापाठ होईल. नोकरीत चांगली स्थिती राहील. धनु -  मित्र नातेवाईक यांच्याशी संपर्क होईल. एखादे पुस्तक वाचून काढा. आरोग्याची काळजी घ्या. वेळच्या वेळी तपासणी, पथ्य पाळणे आवश्यक. दगदग टाळा. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. खाण्यापीन्याकडे लक्ष द्या.

मकर - मन आनंदी राहील. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ तयार होईल. महत्त्वाची बातमी कळेल. व्यवसायात विक्री चांगली होईल. जोडीदाराशी चांगले संबंध राहतील. प्रवास टाळा. घरातील सदस्यांची विचारपूस करा. घरातील छोट्या मोठ्या वादात वेळीच मध्यस्ती करा.

कुंभ - कामे मार्गी लागतील. कुणास पैसे उसने देऊ नका. शेतीच्या कामासाठी जाणकारांचा सल्ला घ्या. एकटेच मनाने निर्णय घेऊ नका. लोक मदतीला येतील. मुलांना अवांतर वाचनाची गोडी लावा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदार आपली काळजी घेईल. 

मीन - उत्तम काळ आहे. अनेक क्षेत्रांत यश मिळेल. कामे पूर्ण होतील. मुलांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीत आपले मत विचारात घेतले जाईल. वरिष्ठ आणि सहकारी तुम्हाला समजून घेतील. कामात उत्साह राहील. दगदग, धावपळ कमी करा.

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१