शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

आजचे राशीभविष्य - 25 मार्च 2021; स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील, पत्नीकडून लाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 07:36 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आज आपण खूप संवेदनशील राहाल. त्यामुळे कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. मानसिक तळमळ आणि शारीरिक अस्वास्थ्य राहील. स्वाभिमान दुखावला जाईल. ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी स्त्री वर्गापासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश कृपेने आज शरीर आणि मन स्वस्थ आणि प्रफुल्लित राहील. घरातील व्यक्तींबरोबर घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास आणि सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल आणि प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सांगतात की थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. स्नेही आणि मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल. धंद्यात वातावरण अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज भावनांच्या प्रवाहात मश्गुल राहाल आणि कुटुंबीय व स्नेही, नातलग त्यात सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. धनलाभ होईल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल. आणखी वाचा सिंह - आज जास्त चिंता आणि भावनाशील राहिल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वादविवादामुळे भांडण निर्माण होईल. उक्ती आणि कृती यात संयम राखणे आवश्यक आहे. उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक होईल. कोणाचे गैरसमज होऊ नयेत याची काळजी घ्या. आणखी वाचा

कन्या - आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यापार- धंद्याच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. पत्नी, मुलगा, वडीलधारे यांचेकडून लाभ होईल. स्त्री मित्र विशेष सहायक ठरतील. संततीकडून शुभवार्ता मिळतील. आणखी वाचा

तूळ - घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. ऑफिस व नोकरीत उत्पन्न वाढ आणि पदोन्नती साठी सुयोग निर्माण होतील. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. सहकारी सहकार्य करतील. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा आणि आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. नोकरी व्यवसायात अडचणी येतील. परदेश गमनाच्या संधी येतील. परदेशात वास्तव्यास असणार्‍या निकटवरर्गीयां बद्दल वार्ता मिळतील. संततीविषयक चिंता राहील. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश सांगतात की आज आपण वाणी आणि संताप यावर आवर घाला अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे तब्बेत खराब राहील. धन खर्च वाढेल. निषेधार्ह आणि अनैतिक कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा. आणखी वाचा

मकर - विचार आणि व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय आणि मित्रां समवेत दिवस आनंदात घालवाल. दलाली, व्याज, कमिशन इ. मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान- प्रतिष्ठा वाढेल. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण राहील. आणखी वाचा

कुंभ - आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती आणि सफलता मिळेल असे श्रीगणेश सांगतात. परिवारात ताळ-मेळ चांगला राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकराकडून आणि मातुल घराण्याकडून लाभ होईल. कामासाठी पैसा खर्च होईल. विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. आणखी वाचा

मीन - कल्पना विश्वात विचारणा करणे पसंत कराल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. प्रेमिका आणि प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. कामुकता जास्त राहील. शेअर- सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल राखण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१