शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 20 मे 2021; 'या' राशिच्या अविवाहित व्यक्तींचे विवाह जमून येतील, मिळकतीमध्ये वृद्धी होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 07:41 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आज पूर्ण दिवस आपणास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने कमी यश मिळेल त्यामुळे हताश होण्याची वेळ येईल. सत्तेसंबंधी थोडे चिंतित राहाल. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष ठेवा. आणखी वाचा

वृषभ -  श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास आणि मनोबल यांसह पूर्ण कराल आणि त्यात सफलताही मिळवाल. वडिलांच्या घराण्याकडून तुम्हाला काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात चांगले यश मिळवतील. सरकारी कामातून फायदा होईल.आणखी वाचा

मिथुन - नवीन योजना सुरु करायला आज उत्तम दिवस आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची कृपादृष्टी मिळण्याचे योग आहेत. भाऊवंद शेजारी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. दिवसभर वेगाने घडणार्‍या घटनात व्यग्र राहाल, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश म्हणतात की, आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. म्हणून मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. कोणाबरोबर गैरसमजातून मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण वाईट होईल. अनैतिक वर्तनाकडे वळू नका असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा 

सिंह - भरपूर आत्मविश्वास आणि दृढ निर्णयशक्ती याच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्मय घेऊन पूर्ण कराल. समाजात मानप्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावनाप्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तब्येतीची किरकोळ तक्रार राहील. आणखी वाचा

कन्या - शारीरिक अस्वस्थते बरोबर मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व यामुळे कोणाबरोबर भांडण होणार नाही याकडे लक्ष द्या. कोर्टकचेरीची कामे टाळणे आज हितकर होईल. आणखी वाचा

तूळ - आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्ही आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांच्या भेटी, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. गृहस्थजिवनात सुख- शांतीचा अनुभव येईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहीतांचेही विवाह जमून येतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान- सन्मान उचांवेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. उच्चपदाधिकारी व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. संततीची प्रगती ऐकून मन खूष होईल. शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र- स्नेही यांच्याकडून फायदा होईल. आणखी वाचा

धनु - शरीरात थकवा, उबग आणि बेचैनी राहील. स्वास्थ्य साधारण असेल. मन चिंतित असेल. प्रवास करू नका अशा श्रीगणेशांचा सल्ला आहे. संततीविषयी चिंता निर्माण होईल. प्रतिस्पर्ध्या बरोबर वादविवाद टाळा. धाडस करू नका. आणखी वाचा

मकर - खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले तर तब्येत खराब होईल असे श्रीगणेश सांगतात. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नोकरी धंद्यातील वातावरण प्रतिकूल राहील. नवीन संबंध जोडताना सावधानी ठेवा. आणखी वाचा

कुंभ - भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यासह प्रणय आणि रोमांस आजचा आपला दिवस रंगवून टाळतील. भिन्नलिंगी व्यक्तीसोबत परिचय वाढेल व मित्रता बनेल. आनंददायी सहली, प्रवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. श्रीगणेशांना भागीदारीत लाभ दिसतो. आणखी वाचा

मीन -  घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक चांगल्या प्रकारे कराल असे श्रीगणेश सांगतात. आज आपल्याला संताप आणि बोलणे यावर संयम ठेवावा लागेल. स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१