शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 12 जुलै 2021; 'या' राशीच्या विवाहोत्सुकांसाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल, स्त्री मित्र लाभदायक सिद्ध होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 07:44 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आपली आत्मीयता अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भयाबरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे तम्ही बेचैन राहाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. वाहन चालविताना सावधानी बाळगा. ऑफिस किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी मध्यम दिवस. आणखी वाचा

वृषभ -  चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने स्फूर्ती आणि उत्साह अनुभवाल. हळवेपणा आणि काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला आणि साहित्य बाहेर यायला चांगला दिवस. मित्राबरोबर प्रवास ठरवाल. आर्थिक गोष्टी पूर्ण होतील. भाग्यवृद्धी होईल असे श्रीगणेश सुचवितात.आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश म्हणतात की आज तुम्हाला कामात सफलता मिळेल फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. परिवारातील वातावरण आनंदाचे राहील. आणखी वाचा

कर्क - शारीरिक व मानसिक सुख मिळेल. मित्र आणि स्वजन यांच्याबरोबर आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल असे श्रीगणेश सांगतात. आपले मन अगदी संयमी राहील.  प्रवासाची शक्यता व आर्थिक लाभाचे योग आहेत. आणखी वाचा 

सिंह - चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वादविवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट कचेरीच्या कामात सावधानीपूर्वक पाऊले टाका. वाणी आणि व्यवहार यात संयम आणि विवेक राखण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

कन्या - तन मनाच्या स्वस्थते बरोबर आजचा आनंदी दिवस तुम्हाला विविध लाभ मिळवून देईल. वरिष्ठ तुमच्यावर खूष राहिल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक सिद्ध होतील. वैवाहिक सुखाचा भरपूर आनंद मिळवाल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेश कृपेने आज तुमची कामे सहजतेने पूर्ण होतील. मान- सन्मानात वाढ होईल. ऑफिसात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले राहील. उत्तम सांसारिक सुख प्राप्त होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आळस, थकवा आणि चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीकडूनच तुम्हाला चिंता लागेल. प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटे येतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका असा श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

धनु - अनैच्छिक घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण तंट्यापासून दूर राहा. आणखी वाचा

मकर - कामाचा व्याप आणि मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांबरोबर आनंदात आजचा दिवस व्यतीत कराल. भिन्न लिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. आर्थिक लाभ व मान- सन्मान यात वृद्धी होईल. स्वास्थ्य चांगले राहील. प्रिय व्यक्तीबरोबर भेट आणि छोटा प्रवास आपल्या आनंदात भर घालतील, असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश म्हणतात की, आज आपल्याला कामात सफलता व यश मिळेल. कुटुंबातील सदस्याबरोबर अधिक स्नेहाचे प्रेमाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की तुमच्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून तुम्ही साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांच्या जवळ आणेल. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. मानसिक संतुलन व बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. आणखी वाचा 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१