शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 21 मे 2021; 'या' राशीच्या व्यक्तींनी अनैतिक बाबींपासून दूर राहावे, धन अधिक प्रमाणात खर्च होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 07:42 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. अधिक कष्ट करूनही अल्प यश मिळेल. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे घरातील व्यक्तींकडे कमी लक्ष द्याल. पोटदुखीचा त्रास जाणवेल. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा

वृषभ -  श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल. अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल. माहेरहून लाभदायक वार्ता येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल.आणखी वाचा

मिथुन - नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने आज शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. छोट्या प्रवासाचा बेत आखाल. अचानकच वैचारिक बदल होतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल. तरीही आर्थिक दृष्टीने काळजी घेण्याची गरज आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

कर्क - आज नकारात्मक दृष्टिकोनातून व्यवहार करू नका असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. परिवारात वातावरण अनुकूल राहणार नाही. अभ्यासात गोडी वाटली तरी विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. अनैतिक बाबींपासून दूर राहा. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपणात आत्मविश्वासाचे प्रमाण जास्त असेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घ्याल. वडील आणि वडील धार्‍यांकडून लाभ होईल. बोलणे- वागणे दर्पयुक्त करू नका असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. रागाचे प्रमाण वाढेल. तब्बेत सांभाळा. आणखी वाचा

कन्या - आपल्या अहंपणाला झटका लागणार नाही अथवा कोणाशी भांडणतंटा होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या. अचानक खर्च वाढतील. विवाद, संघर्ष या पासून शक्यतो दूर राहा. आणखी वाचा

तूळ - आज आपणासाठी शुभ फलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. विविध क्षेत्रांतून लाभ मिळतील आणि आपली प्रसन्नता वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल आणि त्यांच्याकडून लाभ ही होईल. प्रवास अथवा सहलीच्या ठिकाणी जाण्यासाठी दिवस रोमहर्षक ठरेल. विवाहोत्सुकांना जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी जाण्याचे संकेत श्रीगणेश देतात. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. सहजगत्या कामे पूर्ण होतील. गृहस्थजीवनात आनंदी वातावरण राहील. व्यापारानिमित्त बाहेर जावे लागेल. संततीच्या प्रगतीमुळे संतुष्ट राहाल. आणखी वाचा

धनु - आज तब्बेत यथा तथा राहील. शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी संघर्षाचे प्रसंग येतील. प्रतिस्पर्धी व विरोधकांशी संघर्षाचे प्रसंग येतील. असे प्रसंग टाळावेत. आणखी वाचा

मकर - अचानक धनखर्चाचे योग आहेत. त्यामुळे व्यावहारिक तथा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा. सरकारी क्षेत्रांशी संबंधित कामात आपल्या क्षमतेचा योग्य उपयोग कराल. आणखी वाचा

कुंभ - आज खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक काम कराल. प्रवास- सहलीची शक्यता. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. वाहनसुख मिळेल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश आज आपणाला शुभफलदायी दिवस सांगतात. मनोबल आणि आत्मविश्वास चांगला राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. वाचेवर नियंत्रण ठेवा. व्यवसाया धंद्यात चांगले सहकार्य मिळेल. माहेरकडून वार्ता समजतील. आणखी वाचा 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१