शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

आजचे राशीभविष्य - 1 ऑक्टोबर 2021; 'या' राशींच्या लोकांसाठी शूभ असेल महिन्याचा पहिला दिवस, जाणून घ्या, काय सांगते तुमची राशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 07:34 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आज सावधागीरी बाळगण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कारण आज आपण अधिक हळवे आणि संवेदनशील बनाल. साध्या घटनांनी मनाला ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या तब्बेतीची काळजी लागून राहील. विद्यार्जनासाठी दिवस मध्यम फलदायी राहील. स्त्रिया व पाणी यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस मानसिक ताण तणावाचा राहील. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेशाच्या मते आज आपल्या चिंता कमी होतील व उत्साह वाढेल. मन आनंदी राहील. त्यामुळे सृजनशील साहित्यरचना कराल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. कुटुंबीय व विशेषतः आईशी भावबंध वृद्धिगत होतील. प्रवासाचे बेत आखाल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींवर जादा लक्ष द्या. आणखी वाचा

मिथुन - मिश्रफलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. आज थकवा, कार्यमग्नता आणि प्रसन्नाता यांचा संमिश्र अनुभव घ्याल. निर्धारित कामे पूर्ण कराल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटेल पण नंतर यश मिळेल असेही वाटेल. सहकारी सहकार्य करतील. कुटुंबतील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा

कर्क - आज सर्वदृष्टीने आनंद देणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक दृष्ट्या स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयांकडून सुख व आनंद मिळेल. त्यांच्याकडून काही भेटवस्तू मिळतील. प्रवास आणि खाण्यापिण्याचे चांगले बेत आखाल. पत्नीकडून आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक सुख व समाधान मिळेल. आणखी वाचा 

सिंह - संवेदनशीलतेवर संयम ठेवा असा सल्ला आज श्रीगणेश देत आहेत. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. नाहक वादविवाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. स्त्रियांच्या बाबतीत जपून राहा. आज खर्च जास्त होईल. आणखी वाचा

कन्या - आज लाभदायक दिवसाची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धनप्राप्तीसाठी शुभ दिवस. मैत्रिणींकडून लाभाचे संकेत आहेत. प्रियव्यक्तींशी भेट आनंददायी राहील. व्यापारात धनवृद्धीची शक्यता. वैवाहिक जीवनात सुख व समाधान मिळेल. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवासाचे बेत आखाल. घरात सामंजस्याचे वातावरण राहील. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरदारांना बढतीच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल. सहकारी चांगले सहकार्य करतील. शासकीय कार्यांत यश मिळेल.आणखी वाचा

वृश्चिक - आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. वरिष्ठांचे वागणे नकारात्मक राहील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. राजकीय समस्या उद्भवतील. आणखी वाचा

धनु - आज आपण खूप जपून राहा असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कोणतेही नवीन काम औषधोपचार सुरू करू नका. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी राहील. पाण्यापासून जपा. उक्ती व कृती यांत संयम बाळगा. अवैध आणि सरकार विरोधी वृत्तीपासून अलिप्त राहा. तब्बेतीला जपून राहा. आणखी वाचा

मकर - विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज ई. मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल, असे श्रीगणेश सांगतात. धनलाभाचे योग आहेत. संततीच्या अभ्यासाविषयी चिंता राहील. भिन्न लिंगीय व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. नववस्त्रांची खरेदी होईल. जवळचा मनोरंजक प्रवास घडेल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की कार्य सिद्धीच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन-मन उत्साही व आनंदी असेल. कामानिमित्त पैसा खर्च होईल. आणखी वाचा

मीन - आज आपण काल्पनिक जगात रमाल असे श्रीगणेश सांगतात. विद्यार्जन करणार्‍यांना चमक दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. मानसिक संतुलन जपण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष