शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

आजचे राशीभविष्य - ०८ ऑगस्ट २०२१; हातून काही अनैतिक कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 07:13 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...,काय सांगते तुमची राशी..

मेष - आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे कोणाकडून आपल्या भावना दुखावल्या जाण्याचे प्रसंग येतील. आज आईच्या तब्बेतीची काळजी लागेल. घर,जमीन इ व्यवहार आज करू नका. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी अध्यात्म, योग यांचा आधार घ्या. स्त्री आणि वाणी यांपासून जपा असे श्रीगणेश सांगतात. अधिक वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज आपण जास्त संवेदनशील आणि भावूक विचार मनात आणाल आणि त्यामुळे मन द्रवेल. आपली आणि इतरांविषयीची काळजी दूर होईल. त्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति आणि सृजनशीलतेने काम कराल. घरातील व्यक्ती आणि मित्रांसोबत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. अकस्मित कारणाने प्रवास करावा लागेल.  अधिक वाचा

मिथुन - नातलग आणि मित्रांसोबत संवाद साधल्याने आज आनंदी राहाल. असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडाल. महत्त्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवाल. अधिक वाचा

कर्क -श्रीगणेश सांगतात की आज आपल्या मनात प्रेम भावनेचे तरंग उमटतील. त्याच मूड मध्ये राहाल. मित्र, स्वकीय आणि संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासमवेत आपण आपला दिवस खुशीत घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन आणि प्रिय व्यक्तींचा सहवास यामुळे उल्हासीत राहाल. अधिक वाचा

सिंह - कोर्ट कचेरीच्या प्रश्नात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अनैतिक कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या. स्त्रियांच्या बाबतीत विशेष दक्ष राहा. उक्ती आणि कृती यात सुसंवाद राखा. विदेशातून वार्ता येतील. अधिक वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आपणांसाठी घर, कुटुंबीय, व्यापार अशी सर्व क्षेत्रे लाभ देण्यासाठी तयार आहेत. मित्रांसोबत आनंददायी प्रवास घडेल. दांपत्यजीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी शुभ काळ आहे. अधिक वाचा

तूळ - श्रीगणेशांना आज आपणाला नोकरीत बढतीचे योग दिसतात. वरिष्ठांची आपणावर कृपादृष्टी राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. उत्तम विवाहसुख मिळेल. अधिक वाचा

वृश्चिक - आजचा दिवस अनुकूलता आणि प्रतिकूलतेचा संमिश्र राहील असे श्रीगणेश सांगतात. लेखन- साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायात प्रतिकूल वातावरण. वरिष्ठ अधिकार्‍यांचा कल नकारात्मक राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद करू नका. अधिक वाचा

धनु - खाण्या पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. कामात यश मिळायला विलंब झाल्याने निराशा वाटेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. नवे काम हाती घेऊ नका. तब्बेत बिघडेल मन बेचैन राहील. अधिक वाचा

मकर - पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. व्यापार वाढीचे योग आहेत. त्याखेरीज दलाली, व्याज, कमिशन अशा विविध मार्गांनी पैसा मिळून धनभांडारात वाढ होईल. प्रेमिकांसाठी प्रणय परिचयाचा दिवस आहे. विजातीय आकर्षण राहील. अधिक वाचा

कुंभ - सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळेल व प्रसिद्धी पण मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. माहेरहून अनेक शुभवार्ता येतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पण सहकारी चांगले सहकार्य करतील. अधिक वाचा

मीन - आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. अभ्यासात यश आणि प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्यक्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल. प्रेमीजनांना परस्परांचा सहवास लाभेल. अधिक वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष