शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

आजचे राशीभविष्य - 5 जून 2021; आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने अनुकूल दिवस, कष्टाचे फळ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:52 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आज अनुकूल दिवस आहे. शांत मनाने आज सारी कामे पार पडतील. त्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह संचारेल. लक्ष्मीची कृपा असेल. कुटुंबियांसोबत आनंदात वेळ जाईल. मातृघराण्याकडून फायदा होईल असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश सुचवितात की आजचा दिवस सावधतेने घालवा. तुमचे मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभप्रद असेल. अविवाहितांना योग्य जीवनसाथी मिळण्याचे योग आहेत. प्राप्तीसाठी शुभ दिवस. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. कन्या आणि पुत्र यांच्याकडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. आणखी वाचा

कर्क - आज आपण धार्मिक कार्य, पूजा- अर्चा यांत मग्न राहाल. धार्मिक स्थळाच्या भेटीने आनंद मिळेल. कुटुंबीयांसमवेत वेळ चांगला जाईल. तब्बेत चांगली राहील. मन पण चिंतामुक्त राहील. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा

सिंह - आज खूप जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. तब्बेत बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबातील सर्वांशी संयमाने वागा. अवैध कामांपासून दूर राहा. आणखी वाचा

कन्या - सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. भारी वस्त्रे आणि अलंकाराची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारांबरोबर चांगले संबंध राहातील. आणखी वाचा

तूळ - घरातील सुखा-समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. कामात यशप्राप्ती होईल. माता आणि पिता यांचेकडून चांगल्या वार्ता मिळतील. आणखी वाचा

वृश्चिक -श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मध्यम फलप्राप्तीचा. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य आज सुरू करू नका. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने दिवस अनुकूल असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल.  आणखी वाचा

धनु - आज मनात औदासिन्य पसरेल असे श्रीगणेश सांगतात. शारीरिक उत्साह आणि मानसिक तरतरी यांचा अभाव असेल. कुटुंबीयांबरोबर ताण तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित राहील. मानहानी होणार नाही याची काळजी घ्या. वित्तहानीचे योग आहेत. आणखी वाचा

मकर - नवीन कार्य हाती घेण्यास शुभ दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. नोकरी, व्यापार आणि दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडांकडून सहकार्य मिळेल आणि लाभही होतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. आणखी वाचा

कुंभ - आज कोणाशी वादविवाद करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात. धार्मिक कार्यावर खर्च होईल. घरातील वातावरण बिघडेल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होईल आणि निराशा येईल. सबब तब्बेतीकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मीन - आपणासाठी आजचा दिवस शुभ फलदायी राहील. उत्साह आणि स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस चांगला आहे. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ होईल. पण खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष