शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

राशीभविष्य - ४ जानेवारी २०२१ - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील, समाजात मान- प्रतिष्ठा मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 07:13 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषकष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन उदास होईल. शारीरिक कमजोरी जाणवेल. यात्रा- प्रवास यासाठी काळ योग्य नाही. संतती विषयक काळजी निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत विचार केल्याशिवाय पाऊल उचलणे हानिकारक ठरेल. आणखी वाचा

वृषभआज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास यांची महत्त्वाची भूमिका राहील. वडील घराण्याकडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश आणि फायदा मिळेल. आणखी वाचा

मिथुनदिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. भाग्योदयाच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार तुम्हाला अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक आणि शेजारी- पाजारी यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा

कर्कआज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही.  आणखी वाचा

सिंहआत्मविश्वास आणि झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. उक्ती आणि कृतीत उग्रपणा आणि कोणाशी अहंपणाने संघर्ष होण्याची शक्यता श्रीगणेश वर्तवितात. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा

कन्याशारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील असे श्रीगणेश सांगतात. एखाद्याशी तंटाबखेडा होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्यजीवनात खटका उडेल. आणखी वाचा

तूळगृहस्थी जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढीचा योग आहे. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याचे संकेत आहेत. परिवारातील व्यक्ती आणि मित्रांच्या सहवासात खुश राहाल. आणखी वाचा

वृश्चिकआपली सर्व कामे यशस्वी पूर्ण होताना अनुभवाल. संसारात आनंदात आणि समाधानात राहील. समाजात मान- प्रतिष्ठा मिळेल. तब्बेत चांगली राहील. वरिष्ठ अधिकारी आणि वडीलधारे यांची मर्जी राहील. आणखी वाचा

धनुआज कोणतीही धोकेदायक चाल आपणाला अडचणीत टाकेल. कोणतेही काम करण्यात जोश- उत्साह वाटणार नाही. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरीधंद्यात त्रास जाणवेल. आणखी वाचा

मकरनकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि खाण्या- पिण्याकडे चांगले लक्ष द्या असा सल्ला श्रीगणेश देत आहेत. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांबरोबर अंतर्गत मतभेद वाढतील. आणखी वाचा

कुंभप्रणय, रोमान्स, प्रवास, पर्यटन, मनोरंजन आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसमवेत भोजनानिमित्त जाण्याचा योग येईल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्तीचे योग आहेत. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. आणखी वाचा

मीनदैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती आणि कृती यात सांभाळून काम करण्याचा श्रीगणेश सल्ला देतात. प्रतिस्पर्ध्यांना चित कराल. आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष