शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 30 मे 2021; इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:54 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष -  व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिक दृष्ट्या विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्या. आणखी वाचा

वृषभ -  श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मिश्रफलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. धार्मिक स्थळाला भेट देऊन मन सात्विक बनेल. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सल्ला देतात की आज अशुभ घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहा. रोग्याची शल्यचिकित्सा किंवा इलाज आज टाळा. रागामुळे स्वतःची हानी होण्याची शक्यता आहे. डोके शांत ठेवा. मानहानी होणार नाही याचे लक्ष ठेवा. आज तुम्ही मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवा त वादविवाद टाळा यातच आपला फायदा आहे. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस मिश्र आणि स्वकियांबरोबर आनंदपूर्वक घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल पण दीर्घकाळ स्मृतीत राहील. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज तुमचे मन चिंतेने व्यग्र असेल. प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांपासूनही जपूनच राहा. आणखी वाचा

कन्या - आज विद्यार्थ्यांसाठी कठीण दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. संतप्तीविषयी चिंता लागून राहील. सट्टा- शेअर बाजार यात जपून व्यवहार करा. मन दु:खी असेल. आणखी वाचा

तूळ - आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्ट्या व्यस्त राहाल. मातेविषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करा. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल. आणखी वाचा

वृश्चिक -श्रीगणेश सांगतात की आज आपला लाभदायी दिवस आहे. आर्थिक लाभांबरोबर भाग्यातही लाभ होईल. मित्रांबरोबरच्या संबंधात प्रेम असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी योग्य काळ. छोटासा प्रवास ठरवाल.  आणखी वाचा

धनु - आज आपल्या मनाची द्विधा होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश बनेल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका असे श्रीगणेश सल्ला देतात. आणखी वाचा

मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. ऑफिस वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. तब्बेत चांगली राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही यांच्या भेटीने एकदम खुश राहाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. वस्त्र, आभूषणे मिळतील आणखी वाचा

कुंभ - आज कोणाकडून रक्कम स्वीकारणे किंवा पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका असे श्रीगणेश सुचवितात. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. इतर कोणाचे हित करण्याच्या प्रयत्नात स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन - सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र- स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. शुभवार्ता समजेल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. अचानक धनप्राप्तीचा संभव आहे. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष