शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 28 मे 2021; कोणत्याही कामात व्यत्यय यायला हा संताप कारणीभूत ठरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 06:58 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...काय सांगते तुमची राशी.

मेष - आज आपण आपला संताप काबूत ठेवा असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही कामात व्यत्यय यायला हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव जाणवेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या धार्मिक वा मंगल प्रसंगाला हजेरी लावाल. आणखी वाचा

वृषभ - कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा बोझा वाढेल त्यामुळे मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. नवे काम आज सुरू न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मिथुन -शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन आणि वाहनसुख मिळेल.  आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश कृपेने आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. कुटुंबातील व्यक्तीं समवेत घरात सुख- समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्री वर्गांशी आनंदी बातचीत कराल. आणखी वाचा

सिंह - लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा आपणाला मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयात यश आणि प्रिय व्यक्तींशी सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती चांगली राहील. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. घरातील व्यक्तींशी पटणार नाही. त्यामुळे घरात शांतता राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्यापासून भीती आहे. सबब जलाशयाच्या ठिकाणी दुस्साहस करू नका. आणखी वाचा

तूळ - शुभ वा धार्मिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामानिमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल. धनलाभाचे योग आहेत. पैशाच्या गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल असल्याची माहिती श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा

वृश्चिक - कुटुंबात कलह वा द्वेषाचे प्रसंग येऊ नयेत या विषयी दक्ष राहा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनात येणारे नकारात्मक विचार हद्दपार करा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश सांगतात की आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखाल. आर्थिक लाभ होतील. तीर्थयात्रा कराल. सगेसोयरे व मित्रांच्या येण्याने मन खुश राहील. दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील. मान- मरातब वाढेल. आणखी वाचा

मकर - आज सावधानतेने वागण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कठोर परिश्रमानंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. तब्बेतीची तक्रार राहील. दुर्घटनेपासून सावध राहा. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. कोर्ट कचेरी प्रकरणात सांभाळून पावले उचला. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश कृपेने आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल. नोकरी- व्यवसायात लाभ प्राप्ती. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. रमणीय स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत ठरवाल. समाजात प्रसिद्धी मिळेल. संततीची प्रगती होईल. आणखी वाचा

मीन - श्रीगणेश सांगतात की नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आज आपणाला अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार्‍यांना व्यापारवृद्धी होईल आणि उर्वरित रक्कम प्राप्त होईल. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष