शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 27 सप्टेंबर 2021; 'या' ५ राशींच्या व्यक्तींना होणार आर्थिक फायदा; तर यांना मुलगा आणि पत्नीकडून होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 07:41 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुंदर भोजन करणे तसेच आनंदात वेळ घालवणे याचा योग येईल. आर्थिक बाबतीत भविष्या साठी चांगले प्लेनिंग करू शकाल. लक्ष्मीदेवीच्या कृपेने मिळकतीत वाढ होईल. नकारात्मक विचारापासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस उत्साही आणि प्रसन्नतापूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. सगे-संबंधी किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास आणि स्वादिष्ट भोजन दिवस आणखीच आनंदी बनवतील. आर्थिक फायदा संभवतो. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशजी म्हणतात की संयमशील व विचारपूर्ण वर्तन आज तुम्हाला खूप अनिष्ट गोष्टीपासून वाचवील. आपल्या बोलाचालीतून गैरसमज पैदा होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कुटुंबात दुःखीकष्टी वातावरण राहील. डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होईल. आणखी वाचा

कर्क - अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे पाहता आजचा आपला दिवस अतिशय रोमांचक व आनंददायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. मुलगा व पत्नी यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन, तसेच विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह योग आहे. उत्तम भोजन व स्त्रीसुख मिळेल. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश म्हणतात की तुमच्या कामात उशीरा यश मिळेल. ऑफिस किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेणे हे टाळा असा सल्ला श्रीगणेश देतात. पित्याबरोबर मतभेद होतील. आणखी वाचा

कन्या - शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. ऑफिसात वरिष्ठांबरोबर आपला वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा

तूळ - स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार यामुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, आणि कामवृत्ती यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा अधिक खर्च आपल्या मनाला अस्वस्थ करतील.  आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने नोकरी धंदा आणि व्यवसाय क्षेत्र यातून आज आपल्याला भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाल. आपण आनंदी राहाल. मिळकत वाढेल. अविवाहितासाठी विवाह योग आहेत. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश सांगतात की, आर्थिक आणि व्यावापारिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कार्ये यशस्वी होतील. परोपकाराची भावना आज बलवत्तर राहील. आनंदात आजचा दिवस व्यतित होईल. नोकरी व्यवसायात उन्नती आणि मानसन्मान प्राप्त होईल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश म्हणतात की, आजचा आपला दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक कामे आणि व्यवसायात आज नवी विचार प्रणाली अमलात आणाल. लेखन आणि साहित्य क्षेत्रात तुमची सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा आणि ऊबग वाटेल. संततीच्या प्रश्नासंबंधी चिंता निर्माण होईल. आणखी वाचा

कुंभ - नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. आणखी वाचा

मीन - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी उत्तम वेळ आहे. पति-पत्नी मध्ये दाम्पत्यजीवनात निकटता येईल. रोमांस वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष