शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आजचं राशीभविष्य- २७ ऑक्टोबर २०२१; मित्र, नातेवाईकांसोबत वाद होतील; मानसिक स्वास्थ खराब होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 07:13 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास...

मेष - श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे मन चंचल राहील. त्यामुळे निर्णय घेणे कठीण जाईल. त्यामुळे महत्त्वपूर्ण काम पुरे करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल पण नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रित चर्चेत तुम्ही भाग घेऊ नका. आणखी वाचा 

वृषभ - आज अगदी स्थिर होऊन काम करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तसे न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. आणखी वाचा मिथुन - आजचा आपला दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक दृष्ट्या तुम्हाला प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन आणि चांगले कपडे घालायला मिळतील. आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज आपण खिन्नता आणि भय अनुभवाल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा असेल त्यामुळे बेचैन असाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा 

सिंह - श्रीगणेश कृपेने आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्त होईल. मित्रांबरोबर रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठे भाऊ बहिणी यांचा सहवास मिळेल. आणखी वाचा 

कन्या - श्रीगणेश कृपेने आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांची कृपादृष्टी असेल त्यामुळे पदोन्नतीची संधी मिळेल. आणखी वाचा तूळ - श्रीगणेश म्हणतात की, आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्यलेखन यात गुंतून राहाल. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. परदेशात राहणार्‍या मित्र आणि सगे सोयरे यांच्या वार्ता समजल्याने तुम्ही प्रसन्न राहाल. आणखी वाचा 

वृश्चिक - आज तुम्ही स्वास्थ्याकडे जास्त लक्ष द्या असे श्रीगणेश सांगतात. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा धनु - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांबरोबर चांगला दिवस. स्वादिष्ट भोजन, नवे कपडे प्राप्त होतील. विरुद्ध लिंगी व्यक्तींबरोबर आकर्षण वाढेल. त्यांच्याबरोबर रोमांचक भेट होईल. आणखी वाचा 

मकर -आज आपले स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्त होतील. कुटुंबीयांसमवेत आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती होण्यासाठी दिवस यश देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा 

कुंभ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस हा आपला दिवस नाही. वैचारिक दृष्ट्या गर्क राहिल्याने कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय न घेणे हेच बरे. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. आणखी वाचा 

मीन - श्रीगणेश म्हणतात की आजच्या दिवसात उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्या बरोबर वाद-विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. आणखी वाचा 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष