शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य- 26 जून 2021- आर्थिक भरभराट होईल; भाग्याची चांगली साथ राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 08:04 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष- नोकरीत आर्थिकदृष्ट्या चांगली परिस्थिती राहील. पण एखादी मनस्ताप वाढवणारी घटना घडू शकते. फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्या. कागदपत्रांची तपासणी करून मगच सही करा. गृहसौख्यात वाढ होईल. मुलांच्या यशामुळे उत्साह निर्माण होईल.

वृषभ- व्यवसायात फार मोठे धाडस करू नका. कदाचित अंगलट येण्याची शक्यता आहे. जवळच्या लोकांशी जपून व्यवहार करा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. काहींना प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. कागदपत्रे वाचून सही करा.

मिथुन- आज दगदग होण्याची शक्यता आहे. मनात काही शंका-कुशंका राहतील. तब्येतीची काळजी घ्या. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदार आपल्या मनाप्रमाणे वागेल. मुलांवर लक्ष ठेवा. प्रवास शक्यतो टाळलेला बरा. आर्थिक आवक सामान्य राहील.

कर्क- जीवनसाथीबरोबर मधुर संबंध राहतील. गैरसमज होणार नाहीत याची मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव वाढल्यासारखा वाटेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये आपला प्रभाव राहील. आरोग्याची मात्र काळजी घेणे आवश्यक आहे.

सिंह- मनावर थोडे दडपण राहील. खर्चाचे प्रमाण वाढलेले राहील. पैशाची आवक चांगली राहील. नोकरीमध्ये सामान्य परिस्थिती असेल. प्रवास करू नका. दगदगीची कामे टाळा. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. गप्पाटप्पा होतील. त्यामुळे मनावरील ताण कमी होईल.

कन्या- आर्थिक भरभराट होईल. मनाप्रमाणे आर्थिक प्राप्ती होईल. भाग्याची चांगली साथ राहील. नोकरीमध्ये तुमचे वर्चस्व राहील. अधिकार मिळतील. तब्येतीला थोडे जपा. मुलांची काळजी वाटेल. मात्र, मुलांशी संवाद साधला तर बरे राहील.

तूळ- नोकरीमध्ये प्रगती होईल. सुखसोयींमध्ये वाढ होईल. काहींची बदली होण्याची शक्यता आहे. भाग्याची उत्तम साथ राहील. हातून धार्मिक पूजापाठ घडतील. समाजसेवेमध्ये आपण अग्रेसर असाल. प्रसंगी पदरमोड करून आपण पुढारीपण गाजवाल.

वृश्चिक- भाग्याची उत्तम साथ राहील. प्रवास घडतील. अपरिचित लोकांपासून जपा. भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. जीवनसाथीची आपल्याला मदत मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील.

धनू- आर्थिक आवक चांगली राहील. उधारीचे पैसे मिळण्यात थोड्या अडचणी येऊ शकतील. खर्चाला लगाम घालायला हवा. पैतृक संपत्तीच्या कामांमध्ये अडचणी उद्भवतील. व्यवसायात ठीकठाक परिस्थिती राहील. आरोग्याची काळजी घ्या. वादविवाद घालू नका.

मकर- मित्र-मैत्रिणींच्या सहवासात काळ आनंदात जाईल. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील. एखाद्या मोहामध्ये अडकू नका. भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांना चांगले यश मिळेल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी वाद टाळा.

कुंभ- मनावर थोडे काळजीचे सावट राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक परिस्थिती साधारण राहील. नोकरीमध्ये प्रगती होईल. प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त फिरावे लागेल. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. जोडीदार आपल्याला उत्तम साथ देईल.

मीन- भावंडांच्या भेटीगाठी होतील. गप्पा-टप्पा होतील. नोकरीमध्ये आपला चांगला काळ आहे. लोक आपला सल्ला घेतील. आपल्या मनाप्रमाणे ऐकतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्च वाढतील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष