शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आजचं राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२१; विवाहोत्सुकांना मिळेल योग्य जोडीदार; मित्रांकडून होईल लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 07:18 IST

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - आजचा दिवस आपणाला लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय- धंद्यात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंद आणि खेळीमेळीचे वातावरण राहील. गृहसजावटीत काही नावीन्य आणाल. आणखी वाचा    

वृषभ - आज आपण व्यापार अधिक विकसित करण्याकडे अधिक लक्ष द्याल. नवीन योजना आणि नवी विचारधारा यांमुळे व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. तरीही कामात यश मिळण्यास विलंब लागेल. दुपारनंतर व्यापारात अनुकूल स्थिती राहील. आणखी वाचा 

मिथुन -  खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष पुरविण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. नकारात्मक विचार मनातून काढून टाका. त्यामुळे निराशेतून बाहेर पडू शकाल. अनैतिक व अप्रामाणिक कार्ये अडचणीत आणतील. शक्यतो त्यापासून दूर राहा. आणखी वाचा 

कर्क -  कोणाशी भावनात्मक संबंधाने जोडले जाल व ते आज अधिक भावनाशील बनतील असे श्रीगणेश सांगतात. आनंद आणि मनोरंजक वृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. आणखी वाचा 

सिंह - व्यापार विस्ताराच्या दृष्टीने अर्थनियोजन करण्यासाठी दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिकांना त्यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या लोकांकडून व्यावसायिक लाभ होईल. धनप्राप्तीचे प्रबळ योग आहेत. आणखी वाचा 

कन्या - वस्त्र आणि अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष गोडी वाटेल. व्यापारातील विकासामुळे मनात आनंद छटा राहील. आणखी वाचा 

तूळ - आजचा दिवस मध्यम फळदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. परिवारात भांडणे होणार नाहीत याकडे लक्ष द्या. आणखी वाचा 

वृश्चिक - व्यावसायिकांना दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात निर्माण झालेल्या समस्या सुटतील. स्थावर संपत्ती संबंधित कामातही मार्ग निघेल. भावंडांशी संबंध जास्त प्रेमाचे बनतील. दुपारनंतर कामात प्रतिकूलता वाढेल. आणखी वाचा 

धनु - उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवले तर इतरांशी मतभेदाचे प्रसंग टाळू शकाल असे श्रीगणेश सांगतात. दिवसभर मनात आध्यात्मिक विचार राहतील. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. आणखी वाचा 

मकर - श्रीगणेश सांगतात की आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विनाविघ्न पार पडेल. गृहस्थी जीवनात उग्र वातावरण. अध्यात्मात गोडी वाटेल. कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपारनंतर मनावर नकारात्मक विचारांचा ताबा राहील. आणखी वाचा 

कुंभ - आज मानसिक दृष्ट्या धार्मिक भावना जास्त निर्माण होतील. धार्मिक कार्य किंवा धार्मिक यात्रा यांसाठी खर्च करावा लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. ईश्वराची आराधना मनःशांती देईल. आणखी वाचा 

मीन - शेअर- सट्टा यातून आज आर्थिक लाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रम्य ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष