शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

राशीभविष्य- १ एप्रिल २०२२: नोकरीत कामाचं स्वरुप बदलेल; अधिक काम करावं लागेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 07:15 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. हाती पैसा येईल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. मित्र मंडळींच्या नादात वाहवत जाऊ नका. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. आराम करणे आवश्यक आहे.

वृषभ- नोकरीत अनुकूल वातावरण राहील. मात्र कामाचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त परिश्रम करावे लागतील. धनलाभ होईल. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. स्वत:चे व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी प्रयत्न करा.

मिथुन- मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. त्यांना मनासारखी संधी मिळेल. जोडीदार आपल्याला योग्य सल्ला देईल. तो ऐकण्यातच हित आहे. नोकरीत कामाचे स्वरुप बदलेल. जबाबदारी वाढेल. जास्त काम करावे लागेल. थोडी स्वत:साठी पण फुरसत काढा.

कर्क- वड्याचे तेल वांग्यावर काढू नका. आपल्याला यश मिळणार आहे. पण थोडे मागे पुढे झाले तर दुसऱ्यांना दोष देऊ नका. काम झाल्यानंतर दोष दिलेल्या व्यक्तीची नाराजी होऊ शकते. अनेकांचे सहकार्य मिळेल. शांत चित्ताने कामे करा.

सिंह- कामांची यादी बनवून प्राधान्यक्रम ठरवा. त्याप्रमाणे कामे करा. सगळी कामे झालीच पाहिजे, असा अट्टाहास करू नका. झेपतील तेवढीच कामे करा. आरोग्याची काळजी घ्या. फार महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला. कायद्याची बंधने पाळा.

कन्या- प्रेम प्रकरणे पुढे सरकतील. विवाहेच्छुकांना खुशखबर मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. नोकरीत ठीकठाक परिस्थिती राहील. काही बदल होणार नाहीत. हितशत्रूंपासून सावध राहा.

तूळ- नोकरीत वाद विवादापासून दूर राहा. घरात संयमाने वागणे आवश्यक आहे. मुलांशी संवाद साधला पाहिजे. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. अचाट साहस करू नका. प्रवासात दगदग होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आरामात कामे करा.

वृश्चिक- व्यवसायात बरकत राहील. कामाचा ताण राहील. सतत कार्यरत राहाल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. कुणाच्या ऐकीव माहितीवर प्रतिक्रिया देऊ नका.

धनू- मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नातेवाईकांच्या भेटी होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. पैशाचा ओघ चांगला राहील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल.

मकर- जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभ होईल. जमीन, घर खरेदीच्या व्यवहारात यश मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनासारखे भोजन मिळेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. अनोळखी लोकांशी सावधपणे व्यवहार करा.

कुंभ- कामाचा ताण वाढेल. नीट नियोजन केले पाहिजे. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. मालमत्तेची कामे करताना जाणकारांचा सल्ला घ्या.

मीन- काही कटू काही गोड अनुभव येतील. जिव्हाळ्याची माणसे भेटतील. त्यांच्याशी संवाद साधा. मन मोकळे करा. आर्थिक आवक चांगली राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत जैसे थे परिस्थिती राहील.