शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

आजचे राशीभविष्य - 18 फेब्रुवारी 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 07:41 IST

मिथुन, सिंह, तूळ आणि मीन राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा... कसं असेल तुमचं आजचं राशीभविष्य, जाणून घ्या

मेष

 

आज आपण आपला संताप काबूत ठेवा. कोणत्याही कामात व्यत्यय यायला हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव जाणवेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही... आणखी वाचा

वृषभ

कायपूर्तीला विलंब आणि शारीरिक अस्वास्थ्य यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा बोझा वाढेल त्यामुळे मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

मिथुन

शारीरिक आणि मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र आणि कुटुंबीयां समवेत प्रवास किंवा पार्टीचाबेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील... आणखी वाचा

कर्क

आज आपणाला यशाचा आणि आनंदाचा दिवस जाईल. कुटुंबातील व्यक्तीं समवेत घरात सुख- समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्री वर्गांशी आनंदी बातचीत कराल... आणखी वाचा

सिंह

लेखन आणि साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा आपणाला मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयात यश आणि प्रिय व्यक्तींशी सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल... आणखी वाचा ​​​

कन्या

आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. तब्बेत बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. घरातील व्यक्तींशी पटणार नाही. त्यामुळे घरात शांतता राहणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

तूळ

शुभ वा धार्मिक कार्यानिमित्त प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणामुळे घरगुती प्रश्नांवर नीट चर्चा होईल. कामानिमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. नवीन कार्य सुरू करू शकाल... आणखी वाचा

वृश्चिक

कुटुंबात कलह वा द्वेषाचे प्रसंग येऊ नयेत या विषयी दक्ष राहा. कुटुंबातील व्यक्तींबरोबर गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. मनात येणारे नकारात्मक विचार हद्दपार करा अशी सूचना श्रीगणेश देत आहेत.... आणखी वाचा

धनु

आज आपण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखाल. आर्थिक लाभ होतील. तीर्थयात्रा कराल. सगेसोयरे व मित्रांच्या येण्याने मन खुश राहील. मान- मरातब वाढेल... आणखी वाचा

मकर 

आज सावधानतेने वागण्याचा सल्ला. कठोर परिश्रमानंतरही कमी यश मिळाल्याने मनात नैराश्याची भावना उत्पन्न होईल. घरगुती वातावरण पण शांत नसेल. तब्बेतीची तक्रार राहील. दुर्घटनेपासून सावध राहा... आणखी वाचा

कुंभ

आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवातही करू शकाल. नोकरी- व्यवसायात लाभ प्राप्ती. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे... आणखी वाचा

मीन​​​​​​​

नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आज आपणाला अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार्‍यांना व्यापारवृद्धी होईल आणि उर्वरित रक्कम प्राप्त होईल... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष