शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आजचं राशीभविष्य, १६ ऑगस्ट २०२१; वैवाहिक जीवनात गोडी राहील; विवाह सुख मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 07:15 IST

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस.

मेष -  आजचा दिवस संमिश्र फलदायी. आज उक्ती आणि कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. गुप्तशत्रूपासून सावध राहा. रहस्यमय गोष्टीत गोडी वाटेल आणि गूढ विद्येप्रती आकर्षण राहील. आणखी वाचा 

वृषभ - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभफलप्रद. तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या वार्ता येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. विवाह सुख मिळेल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस फार चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो नाहक जाणार नाही. आर्थिक लाभाची शक्यता. तब्बेत चांगली राहील. कामात यश मिळेल. आणखी वाचा 

कर्क -  श्रीगणेश सांगतात की आज जरा दक्ष राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभाला अनुचित दिवस. मानसिक अशांतता आणि उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. आणखी वाचा 

 सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपला दिवस शुभफल देणारा नाही. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला जास्तच भास होतील. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. आणखी वाचा

कन्या -  कोणत्याही कामात विचार न करता भाग घेण्यास श्री गणेश तुम्हाला मना करताहेत. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे बनाल. आप्तमित्र यांची भेट होईल. भावंडाकडून फायदा होईल. आणखी वाचा 

तूळ -   गणेशजी सांगतात की, आज आपली मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय नक्की होत नाही असे झाल्याने नवीन कामे सुरू करू नका. संबंधितांशी दुरुनच संबंध ठेवा नाहीतर मतभेद होतील. व्यवहारात जिद्द सोडा. आणखी वाचा 

वृश्चिक -  श्रीगणेश सांगतात की, आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रियजनांशी सफल भेटी होतील. आणखी वाचा 

धनु - आजचा दिवस कष्टप्रद आहे. म्हणून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कुटुंबियां सोबच मतभेदाचे प्रसंग घडतील. स्वभावात रागीटपणा आल्याने कोणाशी वाद घालू नका. स्वास्थ्य बिघडू शकते. वर्तन आणि बोलणे यावर संयम ठेवा. आणखी वाचा 

मकर - सामाजिक कार्यांतून लाभ होईल कारण वेगवेगळ्या क्षेत्रांतून लाभ होण्याचा आज योग आहे असे श्रीगणेश सांगतात. मित्र आणि स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. शुभ प्रसंगाचे आयोजन घडेल. आणखी वाचा 

कुंभ - आज आपल्याला अनुकूल दिवस आहे, असे श्रीगणेश सांगतात. आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. आणखी वाचा  

मीन - मनातील दुःख आणि अशांतता याने दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांबरोबर सांभाळून कार्य करण्याची सूचना श्रीगणेश देतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष