शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आजचे राशीभविष्य - १५ ऑक्टोबर २०२१; नोकरीत मान सम्मान मिळेल. नोकरीत बढतीचे योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 07:27 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबीयां समवेत घरगुती बाबींचा महत्त्वपूर्ण विचार- विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यां सोबत महत्त्वपूर्ण मुद्दयांवर विचार- विमर्श कराल. ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आई आणि स्त्री वर्गाकडून लाभ संभवतो. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. अधिक वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना अनुकूल योग आहेत. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. अधिक वाचा

मिथुन - कोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. शस्त्रकियेसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय आणि सहकारी यांच्याशी मतभेद होतील. त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. अधिक वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्ही मौज- मजा आणि मनोरंजन यात गढून जाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत करमणूक केन्द्र किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल आणि व्यवसायात भागीदारीमध्ये लाभ मिळेल. भिन्न लिंगीय व्यक्तींचे आकर्षण राहील. अधिक वाचा

सिंह - श्रीगणेशांच्या मते आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. मातुल घराण्याकडून चांगल्या वार्ता मिळतील. अधिक वाचा

कन्या - आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा आणि बोलाचालीत भागच घेऊ नका. प्रणयात सफलता मिळेल. प्रिय व्यक्तीशी मुलाखात होईल. अधिक वाचा

तूळ - गणेशजी सांगतात की अतिशय संवेदनशीलता आणि विचारांचे अवडंबर यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता आणि स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. यात्रा प्रवासा साठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने यात्रा प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. जमीन विषयक व्यवहार अतिशय जपून करा. अधिक वाचा

वृश्चिक - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय आणि मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. भाग्यात लाभदायक बदल होतील. शत्रू आणि प्रतिस्पर्धी यांची चाल हाणून पाडाल. अधिक वाचा

धनु -आपला आजचा दिवस मध्यम फलदायी सिद्ध होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्त्वाचा निर्णय घेऊच नका. अधिक वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस ईश्वर नाम- स्मरणात जाईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. नोकरी व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान सम्मान मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील, त्यामुळे आनंदी राहाल. गृहस्थी जीवनात आनंद होईल. एखाद्या दुर्घटनेमुळे दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. अधिक वाचा

कुंभ - आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक स्वास्थ्य राहणार नाही. कोर्ट- कचेरीतील कटकटीमध्ये पडू नका. अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होऊ नये याकडे लक्ष द्या. कुटुंबातील व्यक्ती विरोधात वागतील. अपघातापासून दूर राहा. अधिक वाचा

मीन - मित्रांकडून आपणाला लाभ होईल आणि त्यांच्यावर खर्च करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र आणि वडीलधार्‍यांशी संपर्क होतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह-संबंध जुळतील आणि भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून शुभवार्ता मिळतील. संततीकडून लाभ होईल. अचानक धनलाभ होण्याचा योग. अधिक वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष