शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य- १५ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या व्यक्तींचं प्रत्येक काम सुरळीतपणे होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 07:29 IST

Todays Horoscope 15 February 2021: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इ. चा त्रास होईल. धर्मार्थ काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. आाणखी वाचा 

वृषभ -  श्रीगणेश सांगतात की आज आपली आवक आणि व्यापार यांत वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसोबत हसण्या- खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. आणखी वाचा मिथुन - आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, ऑफिस आणि सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने प्रसन्न वाटेल. मान- सन्मान वाढतील. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सहकार्यामुळे आपल्या प्रगतीचा मार्ग रुंदावेल. आणखी वाचा कर्क - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्या बरोबरच भाग्योदयाची संधी आपली प्रसन्नता वाढवेल. परदेशातून सुवार्ता येतील. धार्मिक कार्य, देवदर्शन, यात्राधाम यामुळे आनंदात भर पडेल. आणखी वाचा 

सिंह - आपल्या तब्बेतीकडे विशेष लक्ष पुरविण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग आणि बोलणे यांवर ताबा ठेवावा लागेल. घरातील सदस्यांशी मतभेद होतील. आणखी वाचा 

कन्या - सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी पण मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्यजीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी कराल आणि ते वापरण्याची संधी मिळेल. आणखी वाचा 

तूळ - श्रीगणेशांच्या मते नोकरदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत यश आणि सफलता मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. आणखी वाचा 

वृश्चिक - आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. आणखी वाचा

धनू - आज आपणात शारीरिक आणि मानसिक स्फूर्ती आणि उत्साह यांचा अभाव राहील असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात क्लेश आणि कलहजन्य वातावरण राहील. त्यामुळे मनात उदासीनता राहील. आणखी वाचा

मकर - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा पूर्ण दिवस सुखाचा जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार धंद्यात आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा 

कुंभ - श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. परिणामतः उलघाल होईल. तब्बेत पण साथ देणार नाही. वाणीवर ताबा राहणार नाही. त्यामुळे वादविवाद होतील आणि आपल्याच लोकांशी मतभेद होतील. आणखी वाचा 

मीन - आज आपणाला आनंद, उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र आणि घरचे लोक यांच्यासमवेत भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. यात्रेचे योग आहेत. लक्ष्मीची कृपा होईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष