शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

राशीभविष्य- १४ फेब्रुवारी २०२१; 'या' राशीच्या विवाहोत्सुकांना मिळेल योग्य जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 07:24 IST

Todays Horoscope 14 February 2021: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - आज आपणावर लक्ष्मीची कृपादृश्टी राहील असे गणेशजी सांगतात. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होतील. आाणखी वाचा 

वृषभ -  सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त व्हाल व गणेशजींचा आशीर्वाद आपणाला आहे. तब्येतही छान राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधानचा अनुभव घ्याल. व्यवसाय धंद्यात यश मिळेल. आणखी वाचा मिथुन - संमिश्र फलदायी दिवस जाईल असे गणेशजी सांगतात. तब्बेतीत चढ-उतार होतील. व्यवसाय- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाखूष राहतील, त्यामुळे त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. आणखी वाचा 

कर्क - आज मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी ईश्वराचा नाम जप आणि आध्यात्मिक वाचन हाच एकमेव उपाय असल्याचे गणेशजी सांगतात. रागाला आवर घाला. अनैतिक कृत्ये आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. आणखी वाचा 

सिंह - आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र आणि संबंधितांसोबत हिंडण्या- फिरण्याचा बेत आखून आनंददायी प्रवासही कराल. सामाजिक सन्मान मिळेल. भागीदारांबरोबर सकारात्मक चर्चा होईल. आणखी वाचा 

कन्या - स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश आणि कीर्ती वाढेल. माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रसन्नता जाणवेल. आणखी वाचा 

तूळ -आपण बौद्धिक शक्तीमुळे लेखन वा अन्य सृजनकार्य करण्यात आघाडीवर असाल असे श्रीगणेश सांगतात. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. सबब यात्रा- प्रवास टाळावा. आणखी वाचा 

वृश्चिक - आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. स्वभावातील हट्टीपणा सोडून वागल्याने अनेक समस्या सुटतील. नवी वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने यांवर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनू - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सूचित करतात. घरातील सदस्यांसह प्रवास- पर्यटन कराल. मित्र आणि स्वकीयांसोबत वेळेचा सदुपयोग आनंदपूर्वक होईल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेशांचा सल्ला आहे की अधिक वाद-विवाद न करणे आपल्या हिताचे आहे. धार्मिक कार्य आणि उपासनेसाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा 

कुंभ - आज प्रापंचिक बाबीं ऐवजी आध्यात्मिक विषयांकडे आपला जास्त कल राहील. नकारात्मक भावनेला महत्त्व न देता. मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. आणखी वाचा 

मीन - पैशाची देवाण- घेवाण, जुनी येणी तसेच गुंतवणूक करताना सावध राहा. असा संकेत श्रीगणेश देत आहेत. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात जपून राहा. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष