शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - १३ ऑक्टोबर २०२१: कार्य साफल्यामुळे बढती आणि यशाची प्राप्ती होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 07:13 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - हानिकारक विचार, व्यवहार आणि नियोजनापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अन्यथा आळस आणि दुःख वाढेल. तब्बेत यथा-तथाच राहील. कार्ये व्यवस्थित पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन चांगले कराल. व्यापाराच्या उद्देशाने बाहेर पडावे लागेल. अधिक वाचा

वृषभ - सरकार विरोधी कार्यापासून दूर राहण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. नवे कार्य हाती घेऊ नका. तब्बेत बिघडेल. मनातही काळजी राहील. उक्ती आणि कृती यात संगती ठेवा. व्यवसायात अडचणी उद्भवतील. दैवाची साथ मिळणार नाही. अधिक वाचा

मिथुन - आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. दैनंदिन कामात अडकून पडू नका. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र आणि संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. अधिक वाचा

कर्क - खूप मोठया आर्थिक लाभाची प्राप्ती होईल असे गणेशजी सांगत आहेत. व्यावसायिकांना दिवस लाभप्रद. कार्य साफल्यामुळे बढती आणि यशाची प्राप्ती होईल. दुपारनंतर मनोरंजनाच्या हेतूने अन्यत्र जाण्याची संधी मिळेल. मित्रांसमवेत प्रवास- सहली तसेच स्वादिष्ट भोजनाची संधी प्राप्त होईल.  अधिक वाचा

सिंह - साहित्य आणि कलेविषयी गोडी वाटेल असे गणेशजी सांगतात. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थ राहाल. दुपारनंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. तब्बेत चांगली राहील. अधिक वाचा

कन्या - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविण्याकडे लक्ष द्या असा गणेशजींचा सल्ला आहे. आईची तब्बेत बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानीचे योग आहेत. पाण्यापासून जपून राहा. यात्रा प्रवास टाळा. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या विषयी चिंता राहील.  अधिक वाचा

तूळ -श्रीगणेश असा संकेत देतात की आजचा दिवस नवकार्य प्रारंभास अनुकूल आहे. आध्यात्म आणि गूढ रहस्यांकडे आकर्षण राहील. दुपारनंतर मात्र आनंद आणि उत्साहाचा अभाव राहील. घरात क्लेश वाढतील.  अधिक वाचा

वृश्चिक - गणेशजी म्हणतात की कुटुंबातील व्यक्तींशी मने दुखावण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवा. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मन द्विधा असेल. कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर मात्र मनातील मरगळ दूर होऊन मन आनंदी व प्रसन्न होईल. अधिक वाचा

धनु - आज आपणाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत गणेशजी देतात. कोणा स्नेह्याकडे मंगल कार्यानिमित्त जावे लागेल. धार्मिक स्थळी जाण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपारनंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. कृत कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने निराशा होईल. अधिक वाचा

मकर - कोर्टकचेरीत साक्ष न देण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. अस्वस्थ मन, शरीर- प्रकृतीवर दुष्परिणाम करणार नाही याकडे लक्ष दया. बोलणे आणि व्यवहार संयमाने करा. वाहन जपून चालवा. दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल.  अधिक वाचा

कुंभ - आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. अपरिचितांशी परिचय होतील. परंतु दुपारनंतर तब्बेत बिघडेल. परिवारात मनस्तापामुळे वातावरण दूषित होईल. पैसा जास्त खर्च होईल. कोर्ट- कचेरीच्या कामांत जपून वागा. अधिक वाचा

मीन - आज आपले विचार ठाम व पक्के नसतील असे गणेशजी सांगतात. वरिष्ठांकडून व्यवसायात लाभ होतील. पदोन्नती मिळेल. व्यापारविषयक नियोजन कराल. कुटुंबात सुखसमाधान नांदेल. वडील आणि वडील धार्‍यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरही लाभ मिळतील. अधिक वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष