शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 13 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 08:02 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

दिवसभर मानसिक दृष्ट्या समाधान वाटेल. कौटुंबिक जीवन सुखी राहील. त्याच बरोबर सुखमय प्रवास आणि रूचकर भोजन मिळण्याचा योग आहे. हरवलेली एखादी वस्तू सापडेल. तरीही आपले विचार आणि अतिउत्साहाला आवर घाला... आणखी वाचा

वृषभ

आज दिवसभर मनात आनंदाची छटा उमटेल. कामात व्यवस्थितपणे आघाडीवर राहाल आणि योजनेनुसार कार्यपूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील... आणखी वाचा

 मिथुन

आजचा दिवस मध्यम राहील. नवे काम हाती घेण्याचा सल्ला आहे. पत्नी आणि संततीविषयी चिंता वाटेल. त्यामुळे मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्याने तब्बेत नरम-गरम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे... आणखी वाचा

कर्क

आज सांभाळून राहा. शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता राहण्यासाठी आज कष्ट घ्यावे लागतील. छातीत दुखणे किंवा अन्य विकारांमुळे त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने पण मन दुःखी होईल... आणखी वाचा

सिंह

कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात यांमुळे मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र आणि स्नेही यांच्या समवेत एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या- फिरण्याचा आनंद घ्याल. तब्बेतही एकदम चांगली राहील... आणखी वाचा

कन्या

आजचा दिवस आपणासाठी शुभ राहील. मधुर वाणी इतरांच्या मनावर सकारात्मक छाप पाडेल. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्याने वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील... आणखी वाचा

तूळ

आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास झळकेल असा श्रीगणेशाच्या आशीर्वाद आहे. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. वस्त्रे, अलंकार, आनंद, उल्हास यासाठी खर्च होईल... आणखी वाचा

वृश्चिक

आज तुमचा हौसमौज व मनोरंजन यासाठी खर्च होईल. स्वास्थ्यासंबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. दुर्घटनेपासून जपा. कुटुंबीय किंवा सगे- सोयरे यांच्याशी गैरसमज होईल किंवा पटणार नाही... आणखी वाचा

धनु

आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळतील तसेच कौटुंबिक जीवनात सुख संतोष अनुभवाल. मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ मिळेल. आवडत्या व्यक्तीबरोबर सुखद क्षण अनुभवाल. मित्रांबरोबर पर्यटन स्थळाला भेट द्याल... आणखी वाचा 

मकर 

कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद आणि समाधान वाटेल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल आणि ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन आणि मान- प्रतिष्ठा वाढेल... आणखी वाचा

कुंभ 

प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद न करण्याचा सल्ला आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य आणि आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायात वरिष्ठांशी काम करताना सांभाळून राहा. आनंद- मौजमजा यासाठी पैसा खर्च होईल... आणखी वाचा

मीन

आज अनैतिक कामात न पडण्याचा सल्ला आहे. क्रोध आणि वाणीवर संयम ठेवा. आरोग्या विषयी दक्ष राहा. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहा. तब्बेतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल.... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष