शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आजचं राशीभविष्य १२ एप्रिल २०२१; स्त्री सहकारी मदत करेल; अडचणीतून बाहेर काढेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 07:53 IST

Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- मनावरचा ताण निघून जाईल. जोडीदाराशी चांगले संबंध निर्माण होतील. प्रेमिकांना गिफ्टदेखील मिळू शकते. आर्थिक आवक चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर तीदेखील करता येऊ शकेल. एकंदरीत आजचा दिवस चांगला आहे.वृषभ- आज घरात भांडण उकरून काढू नका. भागीदाराशी पण मतभेद होण्याची शक्यता आहे. स्वत:वर जरा संयम ठेवा. आज पैसे मिळतील; पण तेवढेच खर्चदेखील होतील. चैनीवर खर्च होण्याची जास्त शक्यता आहे. आज आपण एखाद्या अडचणीतून नक्की बाहेर याल.मिथुन- आज आर्थिक लाभ उत्तम प्रकारे होईल. त्यामुळे आपल्याला खरेदी करता येईल. मानसिक ताण मात्र राहणार आहे. काही मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात मात्र प्रमोशन होईल. भावाशी संबंध चांगले राहतील. मुले आपले ऐकतील.कर्क- नोकरीमध्ये परिस्थिती चांगली राहील. एखादी स्त्री सहकारी आपल्याला मदत करेल. काही अडचण असेल तर त्यातून ती आपल्याला बाहेर काढेल. आर्थिक परस्थिती चांगली असेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या सध्या मागे लागू नका. मुलांना प्रेम द्या. मार्गदर्शन करा.सिंह- आईची काळजी घ्या. तुमची स्वत:ची तब्येत सुधारेल. मनाला बळकटी येईल असे काहीतरी घडेल. भाग्याची साथ आपल्याला चांगली मिळेल. प्रवास होण्याची शक्यता आहे. मन सैरभैर सोडू नका. मनात चांगले विचार आणण्याचा प्रयत्न करा. मुलांना प्रेम द्या.कन्या- आज आपल्याला पोटाचा त्रास होऊ शकतो. आहाराकडे नीट लक्ष द्या. सात्त्विक आहार घ्या. मसालेदार, तळलेले, जास्त गोड, जड पदार्थ सेवन करू नका. आराम करा. मुलांची काळजी घ्या. अचानक धनलाभ होईल.तूळ- ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा. वडीलधाऱ्यांना आदर द्या. त्यांचा सल्लादेखील ऐका. तो आपल्याला उपयुक्त ठरेल. जोडीदार आज आपल्यावर खूष राहील. आपण वाहन जपून चालवा. आज आपल्याला अचानक पैसे मिळतील.वृश्चिक- भावंडांची साथ आज आपल्याला चांगली मिळेल. वडिलांचा सल्ला फायदेशीर राहील. आपले स्वत:चे आरोग्य जपणे आवश्यक आहे. अर्थमान बरे राहील. लोक आपल्याला पुष्कळ मदत करायला तयार आहेत. पण आपण त्यांना कडू बोलन त्यांना दु:खीकष्टी करू नका.धनू- डोळ्यांची काळजी घ्या. उन्हात फिरू नका. धाडस करू नका. मुलांशी भांडून बोलू नका. घरात आपले सर्वांशी सख्य राहील असे पाहा. पैशाची आवकदेखील चांगली असेल. शेतीविषयक समस्यांवर बुजुर्ग लोकांचे विचार ऐका आणि मग निर्णय घ्या.मकर- भागीदारीचा व्यवहार जपून करा. नोकरीमध्ये बदल किंवा बदली होण्याची शक्यता आहे. आपल्याला कुठून तरी मदत मिळेल. काही कर्ज असेल तर त्यातून बाहेर कसे पडता येईल यासाठी आर्थिक व्यवहारांची माहिती असलेल्या जाणकार हितचिंतकाला शरण जाऊन धडे घ्या.कुंभ- एखाद्या फसव्या योजनेमध्ये अडकू नका. वरवर गोड वाटतात या योजना; पण तुम्ही त्यापासून चार हात दूर राहा. कुणाला वाईट वाटले तरीही. माहेरची माणसे आपल्याला भेटतील. प्रॉपर्टीचे व्यवहार करू नका. वडिलांना जपा. मन प्रसन्न ठेवा.मीन- जमिनीचे व्यवहार करा. त्यात यश मिळेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. धनलाभ होण्याची शक्यता. थोडे धाडस करा. नोकरी-व्यवसायात आपला धाडसी निर्णय फायदेशीर राहील. कोणाशी तरी वाद होईल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष