शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आजचं राशीभविष्य- 10 जून 2021; जोडीदाराशी पटणार नाही; किरकोळ कारणावरून कुरबूर होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 07:29 IST

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस; काय सांगते तुमची रास

मेष - नोकरीत कामाचा व्याप वाढेल. कंटाळा येईल. आर्थिक आवक सामान्य राहील. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलली तर बरे राहील. भावंडांशी गोडीत बोला. आवडत्या विषयावरील माहिती सोशल मीडियावर शोधा.

वृषभ- आर्थिक आवक चांगली राहील. विविध मार्गांनी धनलाभ होईल. अनेक कामे मार्गी लागतील. व्यवसायात सामान्य स्थिती राहील. नोकरीत संघर्ष टाळलेले चांगले राहील. कुणाचे मन दुखावले जाईल असे शब्द वापरू नका. जोडीदाराचे म्हणणे ऐका.

मिथुन- काहींना मित्र-मैत्रिणींना भेटता येईल. भेटवस्तू मिळू शकतात. आर्थिक आवक उत्तम राहील. खरेदीचा आनंद लुटता येईल. आरोग्याची काळजी घ्या. भाऊ-बहीण यांच्याशी संपर्क राहील. एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल.

कर्क- नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. काहींचे खातेबदल होतील. एकदम टोकाची भूमिका घेऊ नका. स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. प्रवासात दगदग होईल. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. मात्र खर्चाऐवजी बचतीला प्राधान्य द्या.

सिंह- मनात सकारात्मक विचार असू द्या. जास्त विचार करू नका. आर्थिक घडी बसण्यास सुरुवात होईल. अनेक कामे हातावेगळी कराल. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात दगदग होण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळा आणि घरीच आराम करा.

कन्या- प्रगतीची नवी क्षितिजे खुणावू लागतील. त्यामुळे मनात उमेद निर्माण होईल. उत्साह वाढेल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात दक्षता घ्या. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. आर्थिक आवक सामान्य राहील. पण जे आहे त्यात आपण आपल्या गरजा पूर्ण कराल.

तूळ- नोकरीत कामाचा ताण वाढेल. पण आपल्याला सगळे मदत करतील. सहकारी वर्गाशी सकारात्मक भावनेने बोला. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही जण समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घेतील. जास्त दगदग करू नका. प्रवासात दगदग होईल.

वृश्चिक- कामधंद्यात आपली स्थिती भक्कम राहील. अनेक कामे मार्गी लागतील. भाऊ-बहीण यांच्या भेटी होतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. जोडीदाराची चांगली साथ राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यात प्रमुख सहभाग राहील.

धनू- मनात सकारात्मक आणि आनंदी विचार राहतील. घरात आपली फर्माईश पूर्ण होईल. घरी राहण्याचे सुख मिळेल. प्रेमीजनांना चांगला दिवस. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. तुमच्या हातून पूजापाठ होईल. एकंदरीत यशस्वी दिवस आहे.

मकर- जोडीदाराशी पटणार नाही. किरकोळ कारमावरून कुरबूर होईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल. मुलांच्या भविष्यकालीन योजनांवर विचार कराल. कुटुंबाच्या गरजा भागतील एवढे पैसे मिळतील.

कुंभ- नशिबाची साथ मिळेल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. त्याच नोकरीत विभाग बदलू शकतील. काहींना नवीन कामे मिळतील. नव्या संधीचा फायदा होईल. भाऊ-बहीण यांना मदत करावी लागेल. जोडीदाराशी सख्य राहील.

मीन- नोकरीत जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्नांशी पराकाष्ठा कराल. मात्र दुसऱ्या लोकांना मदत करण्याच्या नादात आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. अनेक कामे मार्गी लागतील. आर्थिक आवक चांगली राहील. महिलांना खरेदीचा आनंद लुटता येईल. 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष