शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
3
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
4
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
5
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
6
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
7
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
8
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
9
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
10
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
11
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
12
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
14
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
15
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
16
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
17
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
18
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
19
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
20
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."

आजचे राशीभविष्य - ०४ ऑगस्ट २०२१; व्यापारात नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 07:11 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...,काय सांगते तुमची राशी..

मेष - आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल असे श्रीगणेश सांगतात. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल. त्यामुळे उत्साह कमी होईल. हळवेपणा वाढेल. मित्रांसमवेत प्रवासाचे बेत आखाल. अधिक वाचा

वृषभ - महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. धनलाभाची शक्यता. शारीरिक आणि मानसिक दृष्टी या उत्साही राहाल. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात द्विधा वाढेल. आलेली संधी गमावून बसाल. हटवादीपणामुळे इतरांशी संघर्ष, होण्याची शक्यता. अधिक वाचा

मिथुन - आज सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. घरात कुटुंबीयांचा विरोध राहील. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य आणि मानसिक व्यग्रता अनुभवाल. दुपारनंतर कामाचा उत्साह वाढेल. अधिक वाचा

कर्क -आज व्यापारात लाभाचे योग श्रीगणेश सांगतात. रम्य स्थळी सहलीचे बेत आखाल. दुपारनंतर मात्र शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल.  अधिक वाचा

सिंह - नवीन कार्यारंभास आजचा दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. व्यापारात नवीन संपर्कामुळे भविष्यात लाभ होण्याची शक्यता. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत दिवस आनंदात जाईल. अधिक वाचा

कन्या -आपल्या व्यवसायात इतरांनापण धनलाभ होईल असे श्रीगणेश सांगतात. दूरच्या प्रवासाचे योग येतील. तब्बेत सांभाळून राहा. दूरस्थ स्नेह्यांकडून वार्ता प्राप्त होतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील.  अधिक वाचा

तूळ - आळस आणि जास्त कामाचा भार यामुळे मनाची व्याकुळता राहील. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने आरोग्याला घातक अन्न ग्रहण करू नका. प्रवासात विघ्ने येतील. पण दुपारनंतर मात्र दूरस्थ मित्र व संबंधितांकडून वार्ता येतील आणि आपला आनंद द्विगुणित होईल. अधिक वाचा

वृश्चिक - सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्यापिण्याचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. अधिक वाचा

धनु - आजचा दिवस आनंदपूर्ण आणि उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल असे श्रीगणेश सांगतात. योजने प्रमाणे कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. गृहस्थीजीवनात गोडी राहील. अचानक धनलाभ होईल. अधिक वाचा

मकर - कष्टाच्या मानाने फळ कमी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. तरीही कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. तब्बेत चांगली राहील. त्या दृष्टीने बाहेरचे खाणे-पिणे टाळा. दुपारनंतर अपुरी कामे पूर्ण होतील. अधिक वाचा

कुंभ - विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडू यांना आजचा दिवस चांगला जाईल असे श्रीगणेश सांगतात. वडिलांकडून तसेच सरकार कडून लाभ होतील. खंबीर मनोबल असेल. त्यामुळे कार्यपूर्ती होण्यात कसलीच अडचण येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, अधिक वाचा

मीन - काल्पनिक विश्वात दिवस घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत खाण्या-पिण्याचे बेत कराल. आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने दैनंदिन काम पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ. अधिक वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष