शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

आजचे राशीभविष्य - २६ जुलै २०२१; सरकारी कामात यश मिळेल, आवडत्या व्यक्तींची भेट होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 07:35 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस समाजकार्य आणि मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारे आणि आदरणीय व्यक्तींची भेट होईल. अन्यत्र राहणार्‍या संततीकडून शुभ वार्ता मिळतील. अधिक वाचा

वृषभ - श्रीगणेश कृपेने आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती आणि उत्पन्न वाढीच्या वार्ता मिळतील. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख- शांती मिळेल. अधिक वाचा

मिथुन - आज दिवसभरात थोडया प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असे श्रीगणेश सांगतात. शरीरात उत्साहाचा अभाव राहील. त्यामुळे नियोजित काम पूर्ण होणार नाही. मानसिक चिंता राहील. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांचा मंद प्रतिसाद आपला उत्साहभंग करेल. अधिक वाचा

कर्क - संताप आणि नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या- पिण्याकडे लक्ष दिले नाही तर तब्बेत नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण भासेल. अधिक वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टीवरून जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पति- पत्नी दोधांपैकी एकाची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी धैर्याने वागावे. अधिक वाचा

कन्या - आज प्रत्येक गोष्ट अनुकूल राहील. घरात सुख- शांती नांदेल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. सुखदायक घटना घडतील. तब्बेत चांगली राहील. आजारी व्यक्तीच्या तब्बेतीत सुधारणा होईल. आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य लाभेल. अधिक वाचा

तूळ - बौद्धिक कामे आणि चर्चा यांत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांतील प्रगती समाधान देईल. विनाकारण वादविवाद आणि चर्चेत न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तब्बेतीच्या बाबतीत पचनक्रिये संबंधी तक्रारी राहतील. अधिक वाचा

वृश्चिक - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जाणवेल. वडीलधार्‍यांशी पटणार नाही त्यामुळे मनाला वेदना होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इ. चे सौदे किंवा कागदपत्रे करण्याविषयी जपून राहण्याचा सल्ली श्रीगणेश देत आहेत. अधिक वाचा

धनु - गूढ रहस्यमय विद्या, अध्यात्माचा आपणावर विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास आणि संशोधन यांत गोडी राहील. मन शांत आणि प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल. आप्तेष्ट आणि मित्रांच्या आगमनामुळे आपणाला आनंद वाटेल. अधिक वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज झाल्याने मनसिक अस्वास्थ्य जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. अधिक वाचा

कुंभ - शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आणि उत्साहपूर्ण दिवसाचे संकेत श्रीगणेश देतात. आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. आप्तेष्ट आणि मित्र यांच्यासह रुचकर आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल. अधिक वाचा

मीन - आज आपल्या मनाची एकाग्रता राहील असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक व्यग्रता राहील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा असे श्रीगणेश सांगतात. अधिक वाचा