कुंभ राशीतील चंद्राचा प्रभाव आज जन्मलेल्या मुलांवर राहील. प्रयत्न, प्रगतीची समीकरणं त्यात जमून येतील. बौद्धिक प्रबळता, शिक्षण आणि व्यवहार यामध्ये उपयुक्त ठरेल. माता पित्यास शुभ. जन्म नाव- ग, स आद्याक्षर(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)
आजचं पंचांगगुरुवार, दि. 7 फेब्रुवारी 2019- भारतीय सौर 18 माघ 1940- मिती माघ शुद्ध द्वितीया, 07 क. 53 मि.- शततारका नक्षत्र 12 क. 09 मि., कुंभ चंद्र- सूर्योदय 07 क. 12 मि., सूर्यास्त 06 क. 34 मि.
दिनविशेष1897- थोर चित्रकार नारायण इरम पुरम यांचा जन्म1934- चित्रपट अभिनेता, निर्माता सुजितकुमार यांचा जन्म1938- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म1965- मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला1992- आयएनएस शाल्की ही पहिली भारतीय बनावटीची पाणबुडी भारतीय नौदलात कार्यरत झाली2003- श्री शिवछत्रपती जीवनगौरव क्रीडा पुरस्कार रमाकांत आचरेकर यांना जाहीर2003- कामगार नेते जीवनराव सावंत यांचं निधन