शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२१: 'या' राशीच्या लोकांनी सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 07:15 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत. सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. दुर्घटनेपासून जपा. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे स्वास्थ्य बिघडेल. वेळेवर कामे पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वरिष्ठ अधिकारी आपल्या बाजूने असणार नाहीत. संततीशीपण मतभेदाची शक्यता आहे. अधिक वाचा

वृषभ - आवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे आणि स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपारनंतर मात्र तब्बेत जपणे आणि सावध राहणे याविषयी श्रीगणेश सूचना देतात. अधिक वाचा

मिथुन - कौटुंबिक वातावरण आज उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मनोरंजनाचे वारे मनात वाहतील. स्वकीय आणि मित्रांसोबत हिंडणे- फिरणे आणि मनोरंजक ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. अधिक वाचा

कर्क - भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. कोणाशी वादविवाद करू नका. विद्यार्थ्यांना अनुकूल कालावधी. कुटुंबात शांतता नांदेल. अधिक वाचा

सिंह - आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आईच्या तब्बेतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपारनंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ति होईल. बौद्धिक चर्चा टाळा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. नवे कार्य हाती घेऊ नका. अधिक वाचा

कन्या - गूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आर्थिक लाभ होतील. नवीन कार्याचा आरंभ करायला शुभ दिवस. प्रिय व्यक्तींशी सुसंवाद घडतील. विरोधकांवर विजय मिळवाल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बेचैन राहाल. अधिक वाचा

तूळ - सकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते असे श्रीगणेश सांगतात. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबातील व्यक्तींशी मर्यादेने वागा. धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता. दुपारनंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. भाग्यवृद्धीचे संकेत आहेत. कार्यात यश मिळेल. छोटे प्रवास घडतील. अधिक वाचा

वृश्चिक - आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांना भेटण्याचा आनंद घ्या. दुपारनंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपले बोलणे किंवा कृती यामुळे कुटुंबात कोणाला दुःख होईल. ती व्यक्ती आणि आपण, दोघांचे मनात ग्लानी निर्माण होईल. अधिक वाचा

धनु - वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संताप न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कुटुंबातील व्यक्तींशी काही प्रमाणात कटुता निर्माण होईल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. शस्त्रक्रिये सारख्या बाबी आज नकोत. दुपारनंतर कामे यशस्वी होतील. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. मित्र आणि स्नेहीयांच्या भेटीमुळे आपणाला लाभ होईल. अधिक वाचा

मकर - सामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. दुपारनंतर सावध राहा. तब्बेत सांभाळा. वाहन चालवताना दक्ष राहा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजन, आनंद यासाठी खर्च होईल. अधिक वाचा

कुंभ - आपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल असे संकेत श्रीगणेश देतात. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. कामाच्या जागी वरिष्ठ आपल्या कामावर खुश राहतील. बढतीचे योग आहेत. मित्रांबरोबर सहलीला जाण्याचा बेत आखाल. अधिक वाचा

मीन - व्यवसायिक आणि व्यापार्‍यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी नाहक चर्चा किंवा वाद करू नका. प्रवास घडतील. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारानिमित्त दूर गावी जावे लागेल. अधिक वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष