शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
4
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
5
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
6
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
7
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
8
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
9
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
10
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
11
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
12
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
13
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
14
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
15
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
16
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
17
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
18
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
19
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
20
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - ३१ डिसेंबर २०२१; 'या' राशीच्या व्यक्तींना होणार आर्थिक लाभ, भागिदारी व्यवसायात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 07:27 IST

Todays Horoscope 31 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष – अचानक धनलाभाचे योग आहेत. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. महत्त्वाचे काम खोळंबून राहू शकते. त्यामुळे डोक्याला वैताग होईल. थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. आवडत्या छंदासाठी वेळ काढता येईल. एखादे पुस्तक वाचून काढा.

वृषभ – भागिदारी व्यवसायात यश मिळेल. एखाद्या मोठ्या सौद्यात फायदा होईल. जोडीदाराशी मधूर संभाषण करा. आर्थिक लाभ होईल. मात्र आर्थिक व्यवहार करताना चोखपणा राहील याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. घरातील ज्येष्ठांशी चर्चा करा. 

मिथुन – जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. भेटवस्तू मिळतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घेणे योग्य ठरेल. प्रवासात दगदग होईल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. नोकरीत सामान्य परिस्थिती राहिल.

कर्क – अचानक प्रवास ठरतील. मुलांना स्पर्धा परीक्षा, खेळ यात यश मिळेल. घरात सामान्य परिस्थिती राहील. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक आवक सामान्य राहील. 

सिंह – घरात लोकांची ये-जा सुरू राहील. महत्त्वाचे लोक भेटतील. मुलांना घवघवीत यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्तानं प्रवास होईल. तब्येतीची काळजी घ्या. नोकरीत वादापासून थोडे दूर राहा. स्वत:हून वाद ओढावून घेऊ नका.

कन्या – नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. आवडत्या व्यक्तीची साथ मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. प्रवासाचे योग येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मित्र-मैत्रिणी यांच्या भेटी होतील. त्यांच्या सहवासात मन रमेल.

तूळ – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात भरभराट होईल. पैशांचा ओघ सुरू राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. तुमचे महत्त्व वाढेल. समाजसेवा करण्यासाठी पुढाकार घ्याल. खाण्यापिण्याची लयलूट राहील.

वृश्चिक – महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. तुमच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे अनेक कामे मार्गी लागतील. मात्र जीवनसाथीशी गोडीत राहा. आर्थिक आवक चांगली राहील. घरात विविध प्रकारचे पदार्थ बनतील. व्यवसायात विक्री चांगली राहील.

धनू – जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासात सावधानता बाळगा. अनोखळी लोकांशी सावधपणे व्यवहार करा. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. संयम सोडू नका. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धनलक्ष्मीची आपल्यावर कृपा राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. सरकारी कामात यश मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

कुंभ – आर्थिक आवक मनासारखी राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. भेटवस्तू मिळतील. एखाद्या कार्यक्रमात मानसन्मान मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. घरी पाहुणे येतील.

मीन – भाग्याची उत्तम साथ राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. अधिकार वाढवून मिळतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. योग्य सल्ला मिळेल. धार्मिक कामात सहभागी व्हाल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष